पुणे, एप्रिल २०२४: रायल इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या भारतातील आघाडीच्या के-१२ संस्थेने पुण्यातील वाघोली येथील त्यांच्या चौथ्या कॅम्पसचे नुकतेच उद्घाटन केले. ब्रँड रायन इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये नॅशनल करिक्युलम त्यांचा मुख्य गाभा आहे. शिक्षण व क्रीडा व्यतिरिक्त शाळेचे उच्च अनुभवी शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांमध्ये उच्च नैतिकता व सांस्कृतिक मूल्ये बिंबवत त्यांच्या सर्वांगीण विकासाची आणि भविष्याकडे वाटचाल करताना उत्तम नागरिक बनवण्याची खात्री घेतात. मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा त्रिभुवन यांचे नेतृत्व शाळेला लाभले आहे, ज्यांना शिक्षिका म्हणून शाळेचे नेतृत्व करण्याचा १५ वर्षांहून अधिक काळाचा व्यापक अनुभव आहे. अध्यक्ष डॉ. ऑगस्टीन फ्रान्सिस पिंटो, व्यवस्थापकीय संचालक मॅडम (डॉ.) ग्रेस पिंटो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. रायन पिंटो हे ग्रुपचे नेतृत्व करतात.
लाँचदरम्यान मत व्यक्त करत डॉ. ए एफ पिंटो म्हणाले, ”वाघोली संपन्न इतिहास असलेले उदयोन्मुख स्थळ आहे. अनेक वर्षांपासून अनेक व्यवसायांनी येथे प्रगती केली आहे. शाळा प्रेरणादायी शिक्षकवर्गाच्या माध्यमातून सुरक्षित व सक्षम वातावरणामध्ये २१व्या शतकातील विद्यार्थ्यांना केएएसएएम दृष्टीकोनासह (नॉलेज, अॅटिट्यूड, स्किल्स, सोशल आणि मॉरल व्हॅल्यूज) सुसज्ज करण्याची खात्री देते.”
जवळपास २.२ एकर प्रशस्त जागेवर निर्माण करण्यात आलेले आणि ५०,८४१ चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्र असलेले आरआयए वाघोली २,००० हून अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही शाखा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दर्जात्मक सुविधा प्रदान करते. यामध्ये इनोव्हेशन अकॅडमी, डान्स रूम, म्युझिक रूम व प्रयोगशाळा अशा सर्वोत्तम सुविधा आहेत. कॅम्पसमध्ये मोठे स्पोर्टस् मैदान आहे, ज्यामध्ये इनडोअर स्विमिंग पूल, टैनिस, बॅडमिंटन व बास्केटबॉल कोर्टस्, स्केटिंग रिंक, लहान मुलांचे खेळाचे मैदान आणि सर्वात रोचक म्हणजे फुटसलसाठी अनुकूल जागा आहे.