डॉ. अभिजित नातू यांना आर्किटेक्ट एक्सलन्स अॅवार्ड

पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कडून दिला जाणारा उत्कृष्ट शोधनिबंधासाठीचा राष्ट्रीय  स्तरावरील ‘आयआयए अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन आर्किटेक्चर ‘ हा  पुरस्कार येथील ज्येष्ठ आर्किटेक्ट डाॅ. अभिजीत नातू यांना मिळाला आहे. मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् तर्फे नुकत्याच आयोजित   पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार  देण्यात आला.’जनसामान्य लोकांमधे वास्तुकले विषयीची जाण व दृष्टिकोन ‘ हा संशोधनाचा विषय होता.डाॅ. नातू हे पुण्यातील भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.प्राथमिक फेरीतील भारतभरातून आलेल्या शोधनिबंधातून ४  निवडण्यात आले. या ४ शोधनिबंधांचे सादरीकरण तज्ज्ञांसमोर झाले . त्यातून एक पुरस्कारासाठी निवडण्यात आला.