भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘गीत सुमनांजली ‘ या भावगीत मैफिलीचे   आयोजन शनिवारी सायंकाळी करण्यात आले होते.  ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. प्रभाकर जोग,आणि ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या भावगीतांचे  सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात  आले .जुना सुवर्णकाळ जागा करणाऱ्या आणि स्मरणरंजन करणाऱ्या या मैफिलीने रसिक भारावून गेले.वीणा जोगळेकर,दीपक कुलकर्णी  यांनी ही गीते सादर केली .चारुशिला गोसावी (व्हायोलिन ),ओमकार पाटणकर  (तबला),उद्धव कुंभार (साईड रिदम) यांनी  साथसंगत केली. स्मिता अमृतकर  यांनी  कार्यक्रमाचे निवेदन केले.
 
हा कार्यक्रम शनिवार,१३ एप्रिल   २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच   वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०१ वा कार्यक्रम  होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे प्रास्ताविक करून  सर्व कलाकारांचा सत्कार केला.
 
कार्यक्रमाची सुरुवात ‘गणेश  वंदना आणि  गुरुर्ब्रह्मा या श्लोकाने झाली.यानंतर गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,शुभंकरोती म्हणा,लपविलास तू हिरवा चाफास्वर आले दुरूनी,झिम झिम झरती श्रावण धारानकळत सारे घडलेलिंबलोण उतरू कशी,कशी करु स्वागता ही भावगीते सादर केली गेली.या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.मेलडी  मधे जिथे सागरा ,घाल घाल पिंगा वाऱ्या , लिंबोणिच्या झाडामागे चंद्र , ते नयन बोलले काहीतरी , अरे संसार संसार ही गीते सादर केली.खरा तो प्रेमासारखे ‘ संगीत मानापमान या नाटकातले हे गीत पहाडी मांड या रागावर आधारित आहे. ते विशेष दाद मिळवून गेले. शास्त्रीय रागावर आधारित काही हिंदी गीते देखील दाद मिळवून गेली,संगीतकार मदन मोहन,सलील चौधरी यांनी स्वरबद्ध केलेली गीतेही सादर करण्यात आली. सलोना सा सजन है, रसमे उल्फतना जिया लागे ना ,नैनोमें बदरा छाएजिया ले गयो जी मोराराम का गुणगान करिये  या गीतांनी रसिकांची पसंती मिळवली.