अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून, भुलवून, तिचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ही मुलगी बेपत्ता होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली होती. अखेर पोलिसांनी त्या मुलीचा शोध लावला आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या.
अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून, भुलवून, तिचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ही मुलगी बेपत्ता होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली होती. अखेर पोलिसांनी त्या मुलीचा शोध लावला आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश राय (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बिहार येथील असून कामासाठी मुंबईत राहतो. पीडितेचे वडील ज्या कारखान्यात काम करत होते, तेथेच नरेश हा देखील काम करायचा. तर पीडित तरूणी ही अवघी १५ वर्षांची असून ती चेंबुरच्या वाशीनाका भागात राहते. तिची व आरोपीची मैत्री झाली. त्याने गोड बोलून तिला भुलवले आणि तिचे अपहरण केले. ऑगस्ट २०२३ मध्ये की अचानक गाय होती. घटनेच्या दिवशी ती रात्री उशीरापर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांना चिंता वाटू लागली. बरीच शोधाशोध करूनही नुलगी न सापडल्याने पीडितेच्या आई-वडिलांनी अखेर आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिस अनेक महिने तिचा शोध घेतला मात्र ती काही सापडली नाही. त्याचदरम्यान पीडत मुलीचे वडील ज्या कारखान्यात काम करायचे तेथेच काम करणारा नरेश हाही त्याच दिवसापासून कामावर येणं बंद झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. संशय आल्याने पोलिसांनी नरेशचा शोध घेण्यास सुरूवत केली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारमध्ये त्याच्या गावी असल्याचे समजले.
गावी जाऊन वेषांतर करून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही खबर मिळाल्यानंतर आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात करत होती. मात्र अतिशय चलाख असलेला आरोपी त्याच्या राहण्याचे, वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत होता, त्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देऊन पळत होता. तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी वेषांतर करून दोन दिवस बिहारमधील माधवपुरा परिसरात सापळा रचला आणि आरोपी नरेश याला त्याला ताब्यात घेतले. अपहरित केलेल्या अल्पवयीन मुलीला याच परिसरातील एका घरात ठेवल्याचे आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुलीची सुटका करून आरोपीला बेड्या ठोकल्या.