पत्नी व दोन मुलींना जिवंत जाळून माणुसकीला काळिमा फासणारा सैतान…

एक धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. तिथे एका इसमाने दारूच्या नशेत जे केलं, त्याने अख्खं गाव हादरलं. पतीने दारूच्या नशेत त्याच्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची अतिशय धक्कादायक घटना अहमदनर तालुक्यातील वडगाव लांडगा इथं घडली

दारूच्या नशेत माणूस काय करू शकतो याचा काही नेम नाही. काहीवेळा तो हैवानही बनू शकतो. मात्र त्या नशेत त्याच्याकडून असं कृत्य घडतं की त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. तिथे एका इसमाने दारूच्या नशेत जे केलं, त्याने अख्खं गाव हादरलं. पतीने दारूच्या नशेत त्याच्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची अतिशय धक्कादायक घटना अहमदनर तालुक्यातील वडगाव लांडगा इथं घडली आहे. संशयाचं भूत डोक्यात शिरलेल्या पतीने पत्नीसह दोन्ही मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळलं. सोमवारी सकाळी नऊ वाजता ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि मुलींना संपवल्यानंतर , त्याचा कोणताही पश्चाताप त्या इसमाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तो घरासमोरच्याच अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील गोरख लांडगे असे आरोपीचे नाव आहे. तर लीलाबाई सुनील लांडगे असे मृत महिलेचे नाव आहे. त्याच्या दोन मुली अतिशय लहान असून एक नऊ वर्षांची तर दुसरी अवघी १४ महिन्यांची असल्याचे समजते. आरोपी लुनील याने वडगाव लांडगा येथे त्याच्या पत्नीचं आणि मुलींच आयुष्य संपवलं. नगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे याने त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळलं. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे या कृत्यानंतर तो घरासमोरच्या झाडाखालीच निवांत बसला होता. या खळबळजनक घटनेची माहिती नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल असून पंचनामा करत आहेत. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरला आहे.