पुणे (प्रतिनिधी) : SwiftNlift मीडिया ग्रुप प्रस्तुत महाराष्ट्र बिजनेस ॲचिवर्स ॲवाॅर्ड २०२४ हा पुरस्कार सोहळा उद्या (३ मार्च २०२४) रोजी पुण्यातील हॉटेल लेमन ट्री येथे आयोजित केला आहे. या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असणार आहे.
SwiftNlift मीडिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक निलेश साबे यांनी उद्योग विश्वातील वेगवेगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योजकांना स्वतःच्या बिझनेसचे प्रमोशन तसेच बिजनेस कनेक्शन वाढवण्यासाठी हा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे.
या बिझनेस ॲवॉर्डच्या माध्यमातून उद्योजकांना आपला उद्योग इतरांपर्यंत पोहोचवता येतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उद्योजकांची ओळख होऊन बिजनेस कनेक्शन तयार होतात. हा ॲवॉर्ड शो म्हणजे बिझनेसला यशाकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे असे प्रतिपादन SwiftNlift मीडिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक निलेश साबे यांनी केले.