पुणे २७ मार्च २०२४: तंत्रज्ञान इनोव्हेशनमधील सर्वोत्तमतेसाठी प्रयत्न करण्याप्रती कटिबद्ध असलेल्या पोको या आघाडीच्या तंत्रज्ञान ब्रँडने आज त्यांचा नवीन डिवाईस पोको सी६१ च्या लाँचची घोषणा केली. अपवादात्मक कार्यक्षमता, डिझाइन व डिस्प्ले वितरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या पोको सी६१ मध्ये एकूण स्मार्टफोन अनुभव अधिक उत्साहित करण्यासाठी लक्षवेधक दरामध्ये आकर्षक वैशिष्ट्ये सादर करण्याप्रती पोकोचा दृष्टीकोन सामावलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेगमेंट बेस्ट स्टायलिश डिझाइन ६.७१-इंच डॉट ड्रॉप डिस्प्लेसह ९० हर्टझ रिफ्रेश रेट, साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, ”पोको किफायतशीर दरामध्ये उच्च-स्तरीय तंत्रज्ञान प्रदान करण्याप्रती समर्पित आहे आणि आम्हाला सी सिरीजमधील आमचा नवीन स्मार्टफोन पोको सी६१ लाँच करण्याचा आनंद होत आहे. प्रीमियम डिझाइन आणि लक्षवेधक वैशिष्ट्ये असलेला पोको सी६१ ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. आम्हाला विश्वास आहे की, पोको सी६१ बजेट स्मार्टफोन्ससाठी अपेक्षांना नव्या उंचीवर घेऊन जाईल. आम्ही ग्राहकांचा हा डिवाईस वापरण्याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहोत.”
पोको सी६१ किफायतशीर दरामध्ये प्रीमियम डिझाइनसह अल्टिमेट बजेट स्मार्टफोन असण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्लास बॅक डिझाइनसह रॅडियण्ट रिंग डिझाइन आहे. पोको सी६१ स्टायलिश डिवाईस आहे. पोको सी६१ मध्ये ६.७१ इंच एलसीडी डॉट ड्रॉप एचडी+ डिस्प्ले आहे, ज्यामधून शार्प व व्हायब्रण्ट व्हिज्युअल्स मिळतात. ९० हर्टझचा रिफ्रेश रेट आणि १८० हर्टझचा टच सॅम्प्लिंग रेट यासह डिस्प्ले प्रतिसादात्मक व सुलभ आहे.
पोको सी६१ मध्ये शक्तिशाली ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी दिवसभर बॅटरी कार्यरत राहण्याची खात्री देते. या डिवाईससोबत १० वॅट इनबॉक्स चार्जर येतो, जो सहजपणे व जलदपणे डिवाईसला चार्ज करतो. यूएसबी टाइप-सी कनेक्टीव्हीटीसह पोको सी६१ जलद डेटा ट्रान्सफर गती आणि जलद चार्जिंग देतो.
पोको सी६१ ची ड्युअल कॅमेरा सिस्टम आकर्षक फोटो व सेल्फी कॅप्चर करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
रिअर कॅमेऱ्यामध्ये ८ मेगापिक्सल एआय ड्युअल कॅमेरासह १.१२ μm पिक्सल, एफ/२.० अर्पेचर आणि एएफ आहे, तर फ्रण्ट-फेसिंग ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यामध्ये एफ/२.२ अर्पेचर आहे. एआय पोर्ट्रेट मोडसह डेप्थ कंट्रोल, फिल्म फिल्टर्स, टाइम्ड बर्स्ट, एचडीआर अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेले दोन्ही कॅमेरे वापरकर्त्यांना आकर्षकपणे प्रत्येक क्षणांना कॅप्चर करण्यासाठी अनेक पर्याय देतात.पोको सी६१ मध्ये १२ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक जी३६ आणि जवळपास २.२ गिगाहर्टझ क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा कोअर प्रोसेसरची शक्ती आहे, ज्यामधून जलद व कार्यक्षम कार्यक्षमतेची खात्री मिळते.
एलपीडीडीआर४एक्स + ईएमएमसी ५.१ मेमरीसह पोको सी६१ ४+६४ जीबी आणि ६+१२८ जीबी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये येतो, ज्यामुळे अॅप्स, फोटो व व्हिडिओंसाठी व्यापक स्टोरेज क्षमता मिळते. पोको सी६१ मध्ये जवळपास १ टीबीपर्यंत विस्तारित करता येईल असे स्टोरेज देखील आहे. पोको सी६१ भारतातील बाजारपेठेते २८ मार्च दुपारी १२ वाजल्यापासून मिस्टिकल ग्रीन, एथीरिअल ब्ल्यू आणि डायमंड डस्ट ब्लॅक या ३ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. या डिवाईसची किंमत ४+६४ जीबी व्हेरिएण्टसाठी ६,९९९ रूपये आणि ६+१२८ जीबी व्हेरिएण्टसाठी ७,९९९ रूपये आहे. या किमतींमध्ये पहिल्या दिवसासाठी ५०० रूपये कूपन कंझ्युमर ऑफरचा समावेश आहे, ज्यामधून तंत्रज्ञानप्रेमींसाठी लक्षवेधक डिलची खात्री मिळते.