पुणे मार्च २०२४: २०२३ मधील सर्वाधिक चर्चित चरित्रात्मक थरारपट ओपेनहायमर चित्रपट येत्या गुरुवार २१ मार्च २०२४ रोजी जिओ सिनेमावर हिंदी आणि इंग्रजीत प्रक्षेपित होणार आहे. ९६ व्या अकादमी पुरस्कारांत या चित्रपटाला तब्बल१३ विभागात नामांकन मिळाले होते आणि सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेता आणि साहाय्यक अभिनेता यांसह ७ मोठे पुरस्कार जिंकून ओपेनहायमरने बाजी मारली. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला नाही, तर तो समीक्षकांच्या पसंतीस देखील उतरला. परिश्रम, दृढनिर्धार आणि यशाची वेधक कहाणी सादर करणारा, ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित आणि सिलियन मर्फी, एमिली ब्लंट, मॅट डेमन, फ्लोरेन्स पघ रॉबर्ट डाऊनी जूनियर आणि इतर अनेक कलाकारांनी हा चित्रपट नटलेला आहे.
या वेधक थरारपटात दुसऱ्या विश्वयुद्धात अणू बॉम्ब बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जे. रॉबर्ट ओपेनहायमर या प्रज्ञावान अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञाचे जीवनचरित्र उलगडते. ‘अणू बॉम्बचा जनक’ म्हटल्या जाणाऱ्या ओपेनहायमरचा हा लक्षवेधी प्रवास आहे. मॅनहट्टन प्रोजेक्ट दरम्यान लॉस अलमॉस लॅबोरेटरी येथील त्याच्या नेतृत्वाने इतिहासाला वेगळी दिशा दिली. प्रमुख भूमिकेत सिलियन मर्फीने लक्षवेधी परफॉर्मन्स दिला आहे. या गूढ शास्त्रज्ञाला ज्या गुंतागुंतीस व नैतिक द्विधेस तोंड द्यावे लागले, त्याचे सुंदर दर्शन त्याने आपल्या अभिनयातून घडवले आहे.
या चित्रपटाची जगभरातून प्रशंसा झाली. गोल्डन ग्लोबमध्ये या चित्रपटाला बेस्ट ड्रामा मोशन पिक्चर, मोशन पिक्चरचा श्रेष्ठ दिग्दर्शक आणि मोशन पिक्चरमधील श्रेष्ठ अभिनेता यांसह ८ पुरस्कार मिळाले. बाफ्टा फिल्म अवॉर्ड्समध्ये ओपेनहायमर श्रेष्ठ चित्रपट आणि श्रेष्ठ दिग्दर्शक यासहित सात पुरस्कारांचा मानकरी ठरला. त्या व्यतिरिक्त क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स २०२४ मध्ये आठ विभागात या चित्रपटाला पुरस्कार मिळाले. ख्रिस्तोफर नोलनची अप्रतिम कथा-मांडणी आणि फ्लोरेन्स पघ, रॉबर्ट डाऊनी जूनियर, गॅरी ओल्डमन, रामी मलेक व केनेथ ब्रॅनाघ सारख्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना खरोखर मंत्रमुग्ध करून सोडले आहे.बघायला विसरू नका, ओपेनहायमर इंग्रजी आणि हिंदीत २१ मार्च २०२४ रोजी फक्त आणि फक्त जिओसिनेमावर.