अनेक समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – सुनील घनवट

नियमितपणे होत असलेल्या गोहत्या, मंदिर सरकारीकरणामुळे असुरक्षित असलेली मंदिरे, शहरी नक्षलवाद, रोहिंग्यांची घुसखोरी, काश्मिरी हिंदूंच्या समस्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतर आदी अनेक समस्या सोडवण्यासाठी संवैधानिक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यकता आहे. 

आपण आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सक्षमपणे एकत्रित कृती केली पाहिजे. धर्मशिक्षण घेतले पाहिजे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी व्यक्त केले.

हिंदु जनजागृती समितीचे पुणे येथील श्री. नागेश जोशी म्हणाले की, ‘वक्फ बोर्ड कायदा १९९५’ मधील ‘कलम ४०’ नुसार वक्फ बोर्ड कोणत्याही खासगी, सरकारी आणि बिगर सरकारी भूमींवर, मालमत्तांवर स्वत:च्या मालकीचा दावा करू शकतो. यासाठी सर्वांनी याला संघटितपणे विरोध करायला हवा, तर ‘रणरागिणी शाखे’च्या कु. क्रांती पेटकर यांनी म्हणाल्या, ‘भारतात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक महिला, मुली याला बळी पडत आहेत. आज मुलींना लव्ह जिहादचे गांभीर्य लक्षात आणून देणे आवश्यक आहे.’ ‘आज भारतात हलाल जिहादच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा हा डाव आहे’, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले.

ही कार्यशाळा झाल्यावर बर्‍याच जणांनी ‘अशा प्रकारच्या कार्यशाळा आमच्या गावातही आम्ही घेऊ’, असे सांगितले.