हरयाणा झारखंडवर भारी – 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा;4-0 अशा मोठ्या विजयासह सहाव्यांदा अंतिम फेरीत

पुणे, 22 मार्च 2024: पाच वेळचा उपविजेता हॉकी हरयाणाने झारखंडवर 4-0 अशा विजयासह 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. राष्ट्रीय स्पर्धेत फायनल प्रवेशाची त्यांची ही सहावी वेळ आहे.

गोलकीपर, कर्णधार सरिता देवी हिच्या नेतृत्वाखालील हरयाणा संघाने नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी प्रतिस्पर्ध्यांवर एकहाती वर्चस्व राखले. त्यांनी प्रभावी आक्रमण करताना गोल चौकार नोंदवला. त्यातील तीन गोल मैदानी आहेत. त्यानंतर तितकाच अप्रतिम बचाव करताना हॉकी झारखंडला एकही गोल करू दिला नाही.

आजवर दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले. त्यात हरयाणाचा झारखंडवरील हा तिसरा विजय होता.

पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. हरयाणाकडून ज्योती आणि शर्मिलाने सुरेख चाली रचल्या. मात्र, गोल करण्यात त्यांना अपयश आले. मात्र, दुसर्‍या क्वार्टरमध्ये नवनीत कौरने (27व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना संघाचे गोल खाते उघडले. त्यामुळे मध्यंतराला हरयाणाने 1-0 अशी आघाडी घेतली.

दुसर्‍या हाफमध्ये हरयाणाने आणखी तीन गोलांची भर घातली. मध्यंतरानंतर संगीता कुमारीने प्रतिस्पर्ध्यांकडून चेंडू घेत गोलपोस्टच्या दिशेने झेप घेतली. मात्र, तिच्यासह झारखंडचे नशीब जोरावर नव्हते. महिमा टेटे हिचा अचूक फटका कर्णधार सविता पुनियाने शिताफीने अडवला.

40व्या मिनिटाला ज्योती आणि 44व्या मिनिटाला शर्मिला देवीने मैदानी गोल करताना हरयाणाची आघाडी वाढवली. खेळ संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना दीपिकाने झारखंडचा चौथा गोल केला. तोही मैदानी होता.

आजवरचा इतिहास पाहता दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा बाजी मारली आहे. दोनदा पराभूत झाले.

झारखंडने 2022, 2022 मध्ये अव्वल स्थान पटकावले होते तर हरयाणा 2019 आणि 2018 मधील विजेते आहेत.

चारपैकी तीन सामने तिसर्‍या क्रमांकासाठीच्या प्ले-ऑफसाठी आणि एक उपांत्यपूर्व फेरीसाठीचा होता. .

निकाल – उपांत्य फेरी 1: हॉकी हरयाणा:4(नवनीत कौर 27व्या मिनिटाला-पीसी; ज्योती 40व्या मिनिटाला; शर्मिला देवी 44व्या मिनिटाला; दीपिका 57व्या मिनिटाला) वि. हॉकी झारखंड 0. हाफटाईम: 0-0
……
कॅप्शन:
सेमी फायनल1 – हॉकी हरियाणा (पांढरा) वि. हॉकी झारखंड (निळा)
सेमी फायनल2 – हॉकी मध्य प्रदेश वि हॉकी महाराष्ट्र.