‘ईशरे’,पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी आशुतोष जोशी 

पुणे : इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (ईशरे), पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी आशुतोष जोशी यांची २०२४-२५ या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. आशुतोष जोशी आणि त्यांच्या केंद्रीय कार्यकारिणीचा (सीडब्ल्यूसी) शपथग्रहण  सोहळा दि.२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता नोव्होटेल, विमाननगर, पुणे येथे होणार आहे.ईशरे, पुणे शाखेचे मावळते अध्यक्ष नंदकिशोर कोतकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये या क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिकांचा समावेश आहे.चेतन ठाकूर,सुभाष खनाडे ,अमित गुलवाडे, नंदकिशोर कोतकर ,सुजल शाह ,विमल चावडा ,रितेश खेरा,विशाल पवार,प्रमोद वाजे,नीलेश गायकवाड,अरुण चिंचोरे,नीरज मग्नानी,कौस्तुभ वाणी,डॉ.शिकलगार नियाज दिलावर,सुबोध मुरकेवार,मानस कुलकर्णी,डॉ.अंशुल गुजराथी,रशिदा शब्बीर,शशिधर,सिंपल जैन,महेश मोरे,उल्हास वतपाळ,देविका मुथा,हर्षदा राणे,प्रमोद सीजी (जैन),दिलीप झा,तुळशीदास चौधरी यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये आहे. 
शरे’,पुणे चॅप्टरचा हा ३२ वा शपथग्रहण सोहळा आहे.२ एप्रिल १९९३ मध्ये पुणे चॅप्टर ची स्थापना झाली. हीटिंग, रेफ्रिजरेशन ,व्हेंटिलेशन , एअर कंडिशनिंग या क्षेत्रातील अभियंते ,व्यावसायिकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे काम ही संस्था करते.