वाघोली : लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत तब्बल 165 जणांनी परवानाधारक शस्त्र ( पिस्तोल ) घेतले आहे. हे घेणाऱ्या मध्ये माहिती अधिकारी कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक यांचा समावेश आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्याने हे शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे व्यावसायिक परवानाधारक शस्त्र बाळगतात. बहुतांश जण कमरेला शस्त्र लावतात. तर अनेक जण सोबत कार मध्ये ठेवतात. त्यासोबत असलेल्या काडतुसांचा हिशोब त्यांना पोलीसांना द्यावा लागतो. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करावे लागते.
लोणीकंद पोलीस ठाणे अंतर्गत परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्याना जमा करण्याची सूचना पोलीसांनी केली आहे. आता पर्यंत केवळ पाच जणांनी शस्त्र जमा केले आहे. वेळेत शस्त्र जमा न केल्यास पोलीस कारवाई करू शकतात. असे लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी सांगितले.
प्रतिष्ठा वाढविण्यासाठी शस्त्र ?
अनेक जणांना खऱ्या अर्थाने स्वसंरक्षणासाठी शस्त्राची गरज भासत नाही. मात्र केवळ आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी ते परवानाधारक शस्त्र बाळगत असल्याची चर्चा नागरिकांत आहे.