#Woman fight : सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असताना आपण वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो ,अशावेळी बस, रिक्षा, टॅक्सी, रेल्वे, मेट्रो या सगळ्या ठिकाणी प्रवास करत असताना आपल्याला व्यवस्थित जागा मिळावी अशी प्रत्येकाची प्राथमिक इच्छा असते. अनेकदा सीट मिळण्यावरून वाद देखील पाहायला मिळतात.
कधी कधी तर हे वाद इतक्या टोकाला जातात की समूहामध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळते. अशीच एक घटना घडलेली आहे. बस मध्ये सीट मिळवण्यासाठी महिलांनी अक्षरशः हाणामारी केलेली आहे आणि म्हणूनच ही फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. या व्हिडिओमुळे व्यक्ती बस सीट मिळवण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याची कल्पना देखील हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला येऊ शकते.
मेट्रो रेल्वे आणि मेट्रो मध्ये घडलेल्या अनेक गोष्टी यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहत असतो. हे व्हिडिओ व्हायरल देखील होत असतात. दिल्लीतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात मारामारीचे फ्री स्टाईल हाणामारी यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात परंतु ही घटना मेट्रोमध्ये नाहीतर बस मध्ये घडलेली आहे. दिल्ली येथे ही घटना घडली आहे. दिल्लीमध्ये बस मध्ये प्रवास करत असताना महिलांनी सीट मिळवण्यासाठी अक्षरशः फ्रीस्टाइल हाणामारी केली आहे.
हा व्हिडिओ जर आपण व्यवस्थितरित्या पाहिला तर या व्हिडिओमध्ये एक महिला सीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिव्या पासून झालेली सुरुवात ते मारामारी पर्यंत शेवट असा क्रम आपल्याला पाहायला मिळत आहे. महिलांनी केलेली ही डब्ल्यू डब्ल्यू ई फाईट सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत.
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला गेलेला आहे. DELHIBUSES1 एक ट्विटर हँडल द्वारे एक्स सोशल मीडिया साइटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे तसेच हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया तर दिलेल्या आहे पण त्याचबरोबर काहींनी संतप्त प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत.
#दिल्ली की बसों में सदैव आपका स्वागत है आपने कभी दिल्ली की बसों में यात्रा करी है तो अपना अनुभव बताए। @gharkekalesh @gharkekaleshh @ShoneeKapoor @moronhumor @GabbbarSingh @Being_Sanskaari @ChillamChilli @TheViralFever @delhichatter @Prof_Cheems @ajaychauhan41 #delhi pic.twitter.com/ETQ78ec1w5
— Delhi Buses (@DELHIBUSES1) October 24, 2023
एकंदरीत काय तर दिल्ली मेट्रो मध्ये घडणाऱ्या घटना आता बस मध्ये देखील घडू लागलेल्या आहेत याची चर्चा सगळीकडे होत आहेत म्हणूनच वायरल होत असलेला व्हिडिओ हा गंभीर चर्चेचा विषय बनलेला आहे.