मालक कामावरून काढून टाकणार, भर रस्त्यात केला चाकू हल्ला; घटनेचा व्हिडिओ आला समोर

पिंपरी- चिंचवड येथे हाणामारी करत एक जण दुसऱ्याला चाकू मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक जण रक्तबंबाळ झाल्याचं बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील भूमकर चौकातील आहे. दिगंबर शिवाजी गायकवाड असे चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो जखमी शिवप्पा अडागळे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. जखमी शिवप्पा हे दिगंबरला कामावरून काढणार होते. याच कारणावरून त्याने भर रस्त्यात चाकू हल्ला केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दिगंबर गायकवाडला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

BIG NEWS : प्रतिष्ठित ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; ड्रग्ज प्रकरणात होतं नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात शिवप्पा आणि दिगंबर यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली. दोघांनीही मद्य प्राशन केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवप्पाकडे आरोपी दिगंबर हा ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे. परंतु, शिवप्पा त्याला कामावरून काढून टाकणार होता.

गुन्हेगाराने पोलिसांवर सोडले कुत्रे

याची माहिती दिगंबरला मिळताच त्याने टेम्पो आणि त्याची चावी देण्यास नकार दिला होता. यावरून त्यांच्यात भररस्त्यात वाद झाले. दरम्यान भररस्त्यात हाणामारी झाल्यानंतर चालक दिगंबर गायकवाडने शिवप्पा यांच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत ते रक्तबंबाळ झाले.

cats-683

Accident : लग्नासाठी निघाले होते, पण इतक्यात कारचा अपघात… दीड वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू तर…

रस्त्यावरील इतर नागरिकांनी त्यांचे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. दिगंबरने चाकू हल्ला केल्यानंतर नागरिक घाबरले होते. तात्काळ शिवप्पाला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, तर दिगंबर गायकवाडला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते हाणामारी करत असल्याचे आणि चाकू हल्ल्याचं स्पष्ट दिसत आहे.

क्या बात है… ३१ डिसेंबरसाठी सर्वात मोठा निर्णय; रात्रभर…