Siddharth Bhokare : राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडीया प्रदेशाध्यक्ष पदी सिद्धार्थ भोकरे यांची निवड

पुणे (प्रतिक गंगणे) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सिध्दार्थ भोकरे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तसेच निवडीचे पत्र देऊन उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सत्कार केला.

यावेळी प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार उपस्थित होते.

आगामी काळात डिजिटल मिडियामार्फत राज्यातील पत्रकारांसाठी विविध योजना राबवून जनतेला सर्वस्तरातील बातम्या अतिजलदगतीने देण्याचा मानस असल्याचे यावेळी सिध्दार्थ भोकरे यांनी सांगितले.

Siddharth Bhokare