मुंबई, २ जून २०२६: भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आपल्या ‘पार्टिसिपेटिंग (पार)’ पॉलिसीधारकांसाठी ₹२,१७३ कोटींच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च बोनसची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे ८.७४ लाखांपेक्षा जास्त पॉलिसीधारकांना थेट फायदा होणार आहे. हा परतावा मागील वर्षाच्या ₹१,८४२ कोटींच्या तुलनेत १८% अधिक असून कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोनस घोषणा आहे.
हा बोनस सर्व पात्र पार्टीसिपेटिंग विमा योजनांवर दिला जात आहे. हा निर्णय पुन्हा एकदा टाटा एआयएचा दृढ विश्वास दर्शवतो की, ते आपल्या ग्राहकांना त्यांच्या कुटुंबांचे संरक्षण करताना त्यांची भविष्यातील आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कायम पाठिंबा देतात.
इतर पार्टिसिपेटिंग प्लॅन्सव्यतिरिक्त, कंपनीने आपल्या काही अत्यंत प्रमुख प्लॅन्ससाठीही या बोनसची घोषणा केली आहे, ज्यामध्ये टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स स्मार्ट व्हॅल्यू इन्कम प्लॅन, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स शुभ फ्लेक्सी इन्कम प्लॅन, टाटा एआयए शुभ महा लाईफ, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स डायमंड सेव्हिंग्स प्लॅन आणि टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स व्हॅल्यू इन्कम प्लॅन यांसारख्या योजनांचा समावेश आहे. (विविध आवृत्त्या आणि अधिक माहितीसाठी कृपया tataaia.com या संकेतस्थळाला भेट द्या)
पार्टिसिपेटिंग इन्शुरन्स प्लॅन्स, ज्यांना ‘पार’ (Par) प्लॅन्स असेही म्हटले जाते, अशा जीवन विमा पॉलिसी असतात ज्या बोनसच्या स्वरूपात पॉलिसीधारकांसोबत कंपनीचा नफा शेअर करतात. जरी या बोनसची कोणतीही हमी नसली, तरी विमा कंपनीच्या पार्टिसिपेटिंग (किंवा नफा कमावणाऱ्या) फंडाच्या कामगिरीच्या आधारे सामान्यतः दरवर्षी हे बोनस जाहीर केले जातात.
पॉलिसीधारकांसाठी याचा नेमका काय अर्थ आहे?
पॉलिसीधारकांसाठी, ही बोनसची घोषणा म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक कमिटमेंटचे मिळालेले एक वास्तविक फळ आहे. मुलांच्या भविष्यासाठी बचत करणे असो, सेवानिवृत्तीचे नियोजन करणे असो, नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार करणे असो किंवा कुटुंबासाठी सुरक्षा कवच निर्माण करणे असो—पार्टिसिपेटिंग प्लॅन्स जीवनाच्या सुरक्षेसोबतच शिस्तबद्ध पद्धतीने संपत्ती वाढवण्याचा एक उत्तम मेळ घालतात.
हा विक्रमी बोनस टाटा एआयएची आर्थिक मजबुती आणि शिस्तबद्ध फंड व्यवस्थापन दर्शवतो. ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनांतर्गत असलेल्या संपत्ती (एयुएम) साल-दर-साल १८% नी वाढून १,४५,६१७ कोटी रुपये झाल्या आहेत, ज्यामुळे पॉलिसीधारकांना सातत्याने व जबाबदारीने पुढे जाणाऱ्या कंपनीशी जोडले जाण्याचे लाभ मिळत आहेत.
टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सचे अपॉईंटेड ऍक्च्युअरी श्री क्षितिज शर्मा यांनी सांगितले, “आम्हाला आमच्या पार्टीसिपेटिंग पॉलिसीधारकांसाठी विक्रमी बोनसच्या अजून एका शानदार वर्षाची घोषणा करताना खूप अभिमान वाटत आहे. ही विक्रमी बोनसची घोषणा टाटा एआयएचे शिस्तबद्ध गुंतवणूक धोरण, दूरदर्शी फंड व्यवस्थापन आणि आमच्या पॉलिसीधारकांना दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्याची सातत्यपूर्ण वचनबद्धता दर्शवते. आमच्या पॉलिसीधारकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आदर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यासाठी आम्ही त्यांना अशा योजना देतो, ज्यामुळे त्यांना त्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यात मदत मिळते, शिवाय त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक महत्त्वाकांक्षांच्या अनुरूप सुरक्षा, स्थिरता आणि सातत्याने धन वाढवण्याचा पर्याय देखील मिळतो.”
सध्याच्या बाजारपेठेत, स्थिरता, भविष्यात धन वाढण्याची दाट शक्यता आणि जीवन सुरक्षा यांचा उत्तम ताळमेळ ज्यांना हवा असतो अशा ग्राहकांसाठी ‘पार’ (PAR) प्लॅन्स नेहमीप्रमाणेच एक सर्वात विश्वासार्ह आणि शानदार पर्याय आहेत.
टाटा एआयएचे पार्टिसिपेटिंग प्लॅन्स प्रामुख्याने अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत जेणेकरून ग्राहकांना एक भक्कम आणि सुरक्षित आर्थिक भविष्य मिळू शकेल. हे प्लॅन्स जीवन विमा संरक्षणाच्या विश्वासासोबतच, भविष्यासाठी मोठ्या प्रमाणावर संपत्ती वाढवण्याची एक उत्तम संधी देतात.
टाटा एआयएच्या पार्टिसिपेटिंग प्लॅन्सचे मुख्य फायदे:
- कमी जोखीम: चढ-उतारांपासून मुक्त असलेले बोनस परतावे तुम्हाला बाजारातील अस्थिरतेपासून वाचवतात.
- दीर्घकालीन मोठा फंड: कंपनीच्या नफा कमावणाऱ्या फंडाशी जोडून घेतल्याने दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळते.
- जीवन विमा संरक्षण: लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून, तुमच्या पश्चातही तुमच्या कुटुंबाला संपूर्ण आर्थिक आधार मिळतो.
- स्वप्नपूर्तीचे नियोजन: सातत्याने छोटी-छोटी बचत करून तुम्ही भविष्यातील मोठी उद्दिष्टे सहजपणे पूर्ण करू शकता.
फक्त पार्टीसिपेटिंग (पार) योजनाच बोनस पेआऊटसाठी पात्र आहेत.
लाभ, पेआऊट स्ट्रक्चर आणि पात्रता अटी जाणून घेण्यासाठी कृपया www.tataaia.com येथे संपर्क साधावा.





