भारत – २ जून २०२६ – जैनम या एंड-टू-एंड आर्थिक सेवा देणाऱ्या कंपनीने आज आपल्या ब्रँडच्या बदललेल्या ओळखीचे अनावरण केले. या परिवर्तनामधून कंपनीचे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक केंद्रित व अभ्यासपूर्ण भागीदार म्हणून झालेली प्रगती दिसून येते.
बाजारपेठेतील दोन दशकांहून अधिक काळाच्या अनुभवावर आधारित, ही विकसित झालेली ओळख गुंतवणूकदारांना गतिमान बाजारपेठेत अधिक स्पष्टता, शिस्त आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करण्याच्या जैनमच्या कटिबद्धतेला सादर करते. हा बदल निर्णय घेण्याच्या महत्त्वपूर्ण क्षणी गुंतवणूकदारांना बाजारपेठेतील गुंतागुंतींपासून दूर ठेवून, जोखमींचे अधिक विचारपूर्वक मूल्यांकन करून आणि अधिक सुनियोजित पद्धतीने सहभागी होण्यास मदत करण्यावर कंपनीच्या लक्ष्याला निदर्शनास आणतो.
हा फक्त दृश्यात्मक बदल नसून ही बदललेली ओळख ब्रँडचा अनुभव आणि संवाद तत्त्वज्ञानातील व्यापक प्रगतीचे प्रतिनिधीत्व करते. गोष्टी अधिक स्पष्टपणे आणि मोठ्या प्रमाणावर पाहण्याच्या संकल्पनेवर आधारित, ही बदललेली ओळख वेगाने बदलणाऱ्या बाजारपेठेत गुंतवणुकीला अधिक स्पष्टता, दृष्टीकोन आणि सुनियोजित रचना देण्यावर कंपनीच्या लक्ष केंद्रित करण्याला सादर करते.
‘जे’ या अक्षराभोवती तयार केलेली ही दृश्यात्मक यंत्रणा आधुनिक आणि भविष्यकालीन डिझाइन शैलीला अशा घटकांसह एकत्र आणते, जे जैनमचा विश्वास आणि बाजारपेठेच्या आकलनाचा प्रदीर्घ वारसा निदर्शनास आणतात. नव्याने डिझाइन केलेले टायपोग्राफी आणि व्हिज्युअल घटक ग्राहकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी अधिक सुटसुटीत आणि सुसंगत अनुभव तयार करतात.
या महत्त्वाच्या टप्प्याबाबत मत व्यक्त करत जैनमचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिलन पारिख म्हणाले, “जैनमचा प्रवास दीर्घकालीन संबंध, बाजारपेठेतील अनुभव आणि विविध मार्केट सायकल्समध्ये गुंतवणूकदार व ट्रेडर्सना मार्गदर्शन करण्यासोबत येणाऱ्या जबाबदारीतून घडला आहे. हा बदल कंपनी आणि गुंतवणूकदार व्यवस्था दोन्ही ज्या दिशेने वाटचाल करत आहेत, त्याचे प्रतिनिधीत्व करतो. भारतात आर्थिक बाजारपेठेतील सहभाग सातत्याने वाढत आहे, तसे गुंतवणूकदार निर्णय घेताना अधिक आत्मविश्वास आणि प्रबळ दृष्टीकोन शोधत आहेत. गुंतवणूकदारांना शिस्त, संयम आणि माहितीपूर्ण विचारांसह दीर्घकाळासाठी बाजारपेठेकडे पाहण्यास मदत करणे, हे आम्ही जैनमचे मुख्य कर्तव्य मानतो.”
हे विकसित झालेले स्थान तीन मुख्य तत्त्वांवर आधारलेले आहे:
- गोंधळाऐवजी स्पष्टता
- संभाव्यतेऐवजी अचूकता
- निष्क्रिय माहितीऐवजी कृतीयोग्य दिशा
ही तत्त्वे भविष्य घडवण्याच्या जैनमच्या व्यापक दृष्टीकोनाला दृढ करतात, जिथे प्रत्येक आर्थिक निर्णय मार्गदर्शित, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि प्रभावी असेल.
जैनमचे चीफ बिझनेस ऑफिसर पुलक कुमार सिंग म्हणाले, “आजचे गुंतवणूकदार प्लॅटफॉर्मचे मूल्यमापन विश्वास, मार्गदर्शन, अनुभव आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून करतात. आमचे लक्ष चांगल्या निर्णय क्षमतेद्वारे, बाजारपेठेच्या सखोल आकलनाद्वारे आणि अधिक सुनियोजित सहभागाच्या प्रवासाद्वारे गुंतवणूकदारांशी अधिक घट्ट नाते निर्माण करण्यावर आहे. हे बदललेले स्थान व्यवसायाची हीच व्यापक धोरणात्मक दिशा दाखवते.”
जैनमच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर ऐश्वर्या गुप्ता म्हणाले,आर्थिक सेवा क्षेत्र सहसा गुंतागुंती, तांत्रिक शब्द आणि फक्त व्यवहारापुरत्या मर्यादित संवादासाठी ओळखले जाते. या परिवर्तनाद्वारे, आमचा पारंपारिक चौकटीच्या पलीकडे जाण्याचा आणि आजचे आधुनिक गुंतवणूकदार ज्या प्रकारे विचार करतात, निर्णय घेतात व जोडले जातात, त्यांच्यासाठी अधिक स्पष्ट, सोपा आणि सुसंगत असणारा ब्रँड तयार करण्याचा मनसुबा आहे. बदललेल्या ब्रँड ओळखीचा प्रत्येक घटक ग्राहकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी अधिक सुसंगत, आधुनिक आणि जवळचा अनुभव देणारा डिझाइन केला गेला आहे. तसेच गुंतवणूकदारांना अधिक स्पष्टता, दृष्टीकोन आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करण्याच्या जैनमच्या व्यापक तत्त्वज्ञानाशी संलग्न राहतो.”
लँडोरच्या मॅनेजिंग डायरेक्टर गीत नाझिर: फायनान्शियल ब्रँड्सना अधिक संवेदनशील, सर्वोत्तम आणि डिजिटली प्रवाही बनण्याचे आव्हान दिले जात आहे, तेव्हा जैनमने एका स्पष्ट हेतूने आणि स्पष्टतेसह विकसित होण्याची ही संधी ओळखली. हा बदल फक्त एका ब्रँडची ओळख नव्हे तर आजच्या गुंतवणूकदारांची मानसिकता आणि त्यांच्या अपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सादर करणारा ब्रँड अनुभव तयार करण्याबद्दल होता.
ही उत्साहवर्धक ओळख अधिक सुसंगतता आणते आणि गेल्या अनेक वर्षांत ब्रँडने निर्माण केलेल्या विश्वास व विश्वासार्हतेच्या पायावर ठाम राहून भावी पिढीच्या गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याच्या आश्वासनाला अधिक दृढ करते. या संपूर्ण प्रवासातील विश्वास आणि भागीदारीबद्दल आम्ही जैनमच्या नेतृत्त्व टीमचे आभार मानतो. आम्हाला अशा ब्रँडच्या निर्मितीमध्ये मदत केल्याचा अभिमान आहे, जो धोरणात्मकरित्या प्रबळ असण्यासोबत भविष्यासाठी सज्ज देखील आहे.
येत्या काही महिन्यांत जैनमच्या डिजिटल आणि प्रत्यक्ष टचपॉइंट्सवर सोपे इंटरफेस, अधिक स्पष्ट संवाद आणि अधिक सुनियोजित सहभागाच्या माध्यमातून ग्राहकांना या बदलाचा अनुभव घेता येईल.





