रंगांचे भविष्य, आजच अनुभवा: सोनीने संपूर्ण भारतात सादर केले ‘BRAVIA 7II’ सह RGB Backlight Master Drive Pro™

By: Editor_Manas

On: Tuesday, June 2, 2026 2:43 PM

Google News
Follow Us

नवी दिल्ली, २०२६: सोनी इंडियाने नवा ‘BRAVIA 7II’ टीव्ही बाजारपेठेत दाखल केल्याची घोषणा आज केली आहे. घरगुती मनोरंजनाची नवी व्याख्या रचणारे ‘True RGB’ तंत्रज्ञान यामध्ये आहे. अधिक समृद्ध रंग, सखोलता आणि थक्क करून सोडणारा दृश्य अनुभव तुम्ही यामध्ये घेऊ शकाल. निवडक ‘BRAVIA 7II’ मॉडेल्ससाठी प्री-बुकिंग आजपासून सुरू होत आहे. सोनीचे प्रगत डिस्प्ले नाविन्य आणि इंटेलिजेंट प्रोसेसिंग तंत्रज्ञान यांची सांगड घालून, ‘BRAVIA 7II’ टीव्ही तुम्हाला देतो चित्रपटगृहासारखी उत्कृष्ट दृश्य गुणवत्ता! हा टीव्ही तुमच्या रोजच्या टीव्ही पाहण्याला एक अद्भुत आणि विलक्षण मनोरंजन अनुभव बनवतो.

BRAVIA 7II चे बलस्थान आहे, ‘True RGB’ तंत्रज्ञान, जे ‘आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राईव्ह प्रो‘ (RGB Backlight Master Drive Pro™) द्वारे चालते. हे सोनीचे स्वतःचे मालकीचे बॅकलाइट नियंत्रण तंत्रज्ञान आहे. यामुळे अचूक उत्कृष्ट रंग, अधिक सखोल विरोधाभास आणि कमालीचा जिवंतपणा मिळवण्यासाठी लाल, हिरवा आणि निळा प्रकाश स्वतंत्रपणे नियंत्रित केले जातात. ‘कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआर’ (Cognitive Processor XR™) सोबत याची सांगड घातल्यामुळे, BRAVIA 7II कोणतीही गोष्ट हुबेहूब तशीच दिसते जशी आपण ती नैसर्गिकरित्या पाहतो आणि ऐकतो — ज्यामुळे अधिक सखोलता, समृद्ध रंग आणि जिवंत तपशीलांसह अप्रतिम दृश्ये तयार होतात.

या उत्कृष्ट अनुभवाला बळ देणारी मुख्य तंत्रज्ञाने खालीलप्रमाणे आहेत:

  • आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राईव्ह प्रो (RGB Backlight Master Drive Pro™) – सोनीचे हे प्रगत इंडिविज्युअल आरजीबी बॅकलाइट नियंत्रण तंत्रज्ञान अचूक ‘लोकल डिमिंग’ प्रदान करते; ज्यामुळे अधिक गडद काळा रंग मिळतो, ब्लूमिंग कमी होते आणि थक्क करणारा कॉन्ट्रास्ट मिळतो.
  • आरजीबी ट्रायल्यूमिनोस मॅक्स™ आणि ल्युमिनन्स बूस्टर – हे तंत्रज्ञान ‘QD-OLED’ पातळीवरील रंगांची समृद्धता आणि ‘Mini LED’ चा प्रखर ब्राइटनेस एकत्र आणते, जेणेकरून सोनीचे आजवरचे सर्वात समृद्ध रंग आणि उत्कृष्ट चमक अनुभवता येईल.
  • स्मूथ कलर ग्रेडेशन – अतिशय सूक्ष्म आणि उत्कृष्ट रंगबदलांमुळे हे तंत्रज्ञान गडद आणि प्रकाशमान अशा दोन्ही दृश्यांमधील प्रत्येक बारकावा आणि वाढीव सखोलता समोर आणते.
  • एक्स-वाईड अँगल प्रो – या तंत्रज्ञानामुळे  खोलीतील कोणत्याही कोपऱ्यातून टीव्ही पाहताना रंगांची अचूकता आणि कॉन्ट्रास्ट एकसमान दिसतो. तुम्ही टीव्ही कुठूनही पाहत असाल तरी चित्रपटगृहासारखा उत्तम अनुभव मिळतो (हे वैशिष्ट्य केवळ निवडक स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध आहे).

५५ इंच (१४० सेंमी) मॉडेलपासून सुरू होणारी ही मालिका पुढे ६५ इंच (१६५ सेंमी), ७५ इंच (१९० सेंमी) आणि ८५ इंच (२१५ सेंमी) या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. तसेच, या मालिकेचा कळस असणारे एक अतिशय आकर्षक ९८ इंच (२४८ सेंमी) मॉडेल जून महिन्यात येणे अपेक्षित आहे; जे संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी सोनीचे “सिनेमा इज कमिंग होम” हे स्वप्न प्रत्यक्षात आणेल.

True RGB सह वास्तवातल्यासारखे रंग व सखोलता यांचा अनुभव आणि चित्रपटगृहासारख्या रंगांचा आनंद घ्या

सोनीचा नाविन्यपूर्णतेचा वारसा पुढे नेत, ‘BRAVIA 7II’ ने सोनीचे पहिले ‘True RGB LED BRAVIA TV’ तंत्रज्ञान सादर केले आहे. हे तंत्रज्ञान थेट उजेड असलेल्या घरांमध्येही अचूक रंग दाखवण्यासाठी स्वतंत्रपणे चालणारे लाल, हिरवे आणि निळे एलईडी वापरते. ‘आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राईव्ह प्रो™’ तंत्रज्ञानावर आधारित ही प्रगत बॅकलाइट नियंत्रण प्रणाली, ब्राइटनेस वाढवण्यासाठी, प्रकाशाचा अनावश्यक थर (ब्लूमिंग) कमी करण्यासाठी, अधिक गडद काळा रंग देण्यासाठी आणि पारंपारिक मिनी एलईडी डिस्प्लेच्या तुलनेत अतिशय शुद्ध रंग तयार करण्यासाठी प्रत्येक एलईडी अत्यंत अचूकतेने नियंत्रित करते.

‘आरजीबी ट्रायल्यूमिनोस मॅक्स™’ मुळे हा टीव्ही सोनीचे आजवरचे सर्वात विस्तृत रंगांचे व्हॉल्यूम प्रदान करतो, ज्यामध्ये कमालीच्या अचूकतेसह रंगांचे विस्तृत स्पेक्ट्रम पुन्हा तयार केले जातात; तर ‘स्मूथ कलर ग्रेडेशन’ प्रत्येक दृश्यामध्ये अखंड आणि अतिशय सूक्ष्म रंगबदल शक्य करते. ‘ल्युमिनन्स बूस्टर’ सह ‘आरजीबी ट्रायल्यूमिनोस मॅक्स’ वर आधारित हे तंत्रज्ञान, ‘QD-OLED’ सारखी रंगांची सखोलता आणि ‘मिनी एलईडी’ तंत्रज्ञानाचा ब्राइटनेस यांची सांगड घालते, जेणेकरून सोनीचा आजवरचा सर्वात समृद्ध आणि जिवंत दृश्य अनुभव ग्राहकांना मिळेल. ६५ इंच आणि त्याहून मोठ्या मॉडेल्सवर, ‘एक्स-वाईड अँगल प्रो’ खोलीतील कोणत्याही कोपऱ्यातून टीव्ही पाहताना रंगांची अचूकता आणि कॉन्ट्रास्ट एकसमान राखते; ज्यामुळे प्रत्येक सीटवरून टीव्ही पाहण्याचा सर्वोत्तम अनुभव मिळतो.

दर्जेदार दृश्य गुणवत्तेसाठी ‘Cognitive Processor XR™’ द्वारे समर्थित

‘BRAVIA 7II’ च्या मुख्य केंद्रस्थानी सोनीचा कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआर™’  आहे, जो माणसांना नैसर्गिकरित्या दिसणाऱ्या आणि ऐकू येणाऱ्या पद्धतीनुसारच चित्रांवर प्रक्रिया करतो. यामुळे हा टीव्ही रिअल टाईममध्ये

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 2, 2026

June 2, 2026

June 2, 2026

June 2, 2026

June 2, 2026

June 2, 2026