Crime : वाढदिवसाला सरप्राईज देतो म्हणून बोलावलं; हात-पाय बांधून IT प्रोफेशनल मैत्रिणीला जिवंत जाळलं

नवी दिल्ली- तमिळनाडूच्या चेन्नईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime) एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रोफेशनल मुलीचे हात-पाय बांधून जीवंत जाळण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुलीच्या वाढदिवशीच हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या मित्राला अटक केली आहे.

#AishwaryaRaiBachchan : ऐश्वर्याच्या लिपस्टिकमुळे बच्चन कुटुंब अडचणीत, अमिताभ यांना…

आरोपी हा मुलीचा मित्र असून दोघेही आयटी प्रोफेशनल आहेत. पीडित मुलगी नंदीनी हिचे पाय आणि हात बांधण्यात आले. त्यानंतर तिच्या मानेवर ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आले. वेत्रीमारन उर्फ पंडी महेश्वरी असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केलीये. त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. माहितीनुसार, वेत्रीमारन याने नंदिनीसोबत लग्न करता यावे यासाठी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली होती.

Gautami Patil : गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर? व्हिडीओ एकदा पहाच!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी कथितरित्या वेत्रीमारनकडे दुर्लक्ष करु लागली होती. शिवाय तिची इतर मित्रासोबतची जवळीक वाढली होती. त्यामुळे वेत्रीमारन हा संतापला होता. वेत्रीमारन याने वाढदिवसाला सरप्राईज देण्याच्या हेतूने नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधून एका अज्ञात ठिकाणी नेले. त्याच ठिकाणी वेत्रीमारन याने नंदिनीचा घात केला.

Pune Crime : जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून केली हत्या, पुण्याच्या ‘या’ भागात घडली ही धक्कादायक घटना

स्थानिकांना नंदिनी अर्ध्या जळालेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. नंदिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि वेत्रीमारन हे मुळचे मदुराईचे असून त्यांनी १० वी पर्यंत एकत्र शिक्षण घेतलं आहे. दोघेही ८ महिन्यांपासून थोराईपक्कम येथील एका आयटी कंपनीत काम करत होते.