Today’s Horoscope : २६ डिसेंबर २०२३; सहलीचा बेत, धनलाभ संभवतो

मेष – आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. (Today’s Horoscope)

वृषभ – महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो.

मिथुन – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील.

कर्क – आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल.

Crime : वाढदिवसाला सरप्राईज देतो म्हणून बोलावलं; हात-पाय बांधून IT प्रोफेशनल मैत्रिणीला जिवंत जाळलं

सिंह – आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.

कन्या – आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

तूळ – आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल.

वृश्चिक – वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल.

धनु – शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल.

मकर – आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल.

कुंभ – विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल.

मीन – आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल.