Pune Crime : जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून केली हत्या, पुण्याच्या ‘या’ भागात घडली ही धक्कादायक घटना

पुणे: जेवण न दिल्यामुळे महिलेला बेदम मारहाण (Pune Crime) करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज (Katraj Murder) भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) पतीला अटक केली. पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Pune JN1 Covid : पुणेकरांनो सावधान : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पुण्यात शिरकाव; वाचा पुण्यात ‘किती’ रूग्ण आढळले

तानाजी कांबळे (Tanaji Kamble) असे नराधम पतीचे नाव आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Katraj Wife Murder) करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय 42, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय 19) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sexual abuse : मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार; विवस्त्र करून…

नराधम पती व्यावसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता. कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्या पत्नी माधुरीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरू केलं. यादरम्यान त्याने पत्नी मधुराच्या छातीवर जोर जोरात बुक्क्या मारल्या या मारहणीनंतर माधुरी खाली कोसळली. मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाली आणि यात तिचा मृत्यू झाला.

Christmas Day 2023 : शाळेत मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवू नका अन्यथा कारवाई, कुणी काढले फर्मान?

नराधम पती आणि पत्नीमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. दोघांमध्ये घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत असत. दरम्यान,शुक्रवारी आरोपीचे त्याच्या पत्नीशी पुन्हा भांडण झाले. भांडण झाले त्यावेळी पती तानाजी कांबळे मद्यधुंद अवस्थेत होता. जेवण का बनवले नाही आणि त्यातूनच वाद सुरु झाला. आरोपीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.