#Whatsapp : आता फुकटात नाही वापरता येणार Whatsapp फीचर, 2024 मध्ये द्यावे लागणार पैसे

#Whatsapp : व्हॉट्सअॅप आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. प्रत्येक जण व्हॉट्सअप वापरतो. जगभरातील अब्जावधी लोक दररोज व्हॉट्सअॅपवर एकमेकांशी संवाद साधतात. अनेक जण त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करतात. डेटा शेअर करण्यासाठी ही त्याचा वापर होऊ लागला आहे. अनेक वर्षांपासून, Google ने युजर्सना कोणतेही पैसे न आकारता Google Drive वर त्यांच्या WhatsApp चॅटचा बॅकअप घेण्याची परवानगी दिली आहे. पण या वर्षी सर्व काही बदलणार आहे.

वर्ष 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांत, व्हॉट्सअॅप चॅट बॅकअप युजर्सच्या Google ड्राइव्ह स्टोरेज मर्यादेमध्ये समाविष्ट करणे सुरू होईल. जे 15 जीबीवर अवलंबून होते त्यांच्यावर याचा परिणाम होईल. याचा अर्थ असा की जे लोक त्यांचे खास फोटो, व्हिडिओ आणि चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी Google Drive वर अवलंबून आहेत त्यांना आता WhatsApp सह Google One द्वारे अतिरिक्त स्टोरेज खरेदी करण्याचा विचार करावा लागेल.

Google One आणि Google Drive संबंधित सदस्यत्व योजना मासिक आणि वार्षिक आधारावर तीन मुख्य योजना ऑफर करतात. मासिक खर्चामध्ये मूलभूत (100GB) £1.59 / $1.99, मानक (200GB) £2.49 / $2.99 ​​आणि प्रीमियम (2TB) £7.99 / $9.99 यांचा समावेश आहे. या योजना मासिक आधारावर होत्या. वार्षिक आधाराबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना मूळ (100GB) योजनेसाठी £15.99 / $19.99, मानक (200GB) योजनेसाठी £24.99 / $29.99 आणि प्रीमियम (2TB) योजनेसाठी £79.99 / $99.99 द्यावे लागतील. भारतात अजून किंमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

whatsapp

असे वृत्त आहे की व्हॉट्सअॅप एका नवीन वैशिष्ट्यावर देखील काम करत आहे, जे वापरकर्त्यांना त्यांचे फोन नंबर न सांगता एकमेकांशी कनेक्ट होऊ देईल. मात्र, हे फिचर कधी येणार याबाबत ठोस माहिती मिळालेली नसून, यंदाही हे फिचर येऊ शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.