Pune Crime : खंडणीसाठी अपहृत मुलाची लोणावळ्यातून सुखरूप सुटका ; भाडेकरूनेच कृत्य केल्याचे तपासात उघड

Pune Crime : पुणे : शाळेत जाणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून ७० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका केली आहे. अपहरण करणारा तरुण हा मुलाच्या वडिलांचा भाडेकरू असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime: Child Kidnapped for Ransom Safely Released from Lonavala; Investigation revealed that the act was committed by the tenant)

अपहरण झालेला मुलगा कात्रजमधील संतोषनगर परिसरात राहायला आहे. सोमवारी (ता. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकावरून आरोपींनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

Pune Crime : खंडणीसाठी अपहृत मुलाची लोणावळ्यातून सुखरूप सुटका ; भाडेकरूनेच कृत्य केल्याचे तपासात उघड

मुलाला जिवंत बघायचे असेल तर त्वरित पैसे पाठवा, अशी धमकी अपहरणकर्त्याने दिली. पोलिसांकडे तक्रार करू नका. पैसे दिल्यानंतर तासाभरात मुलाला सोडण्यात येईल, अशी धमकी त्याने दिली. मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात तरुण लोणावळ्यात असल्याचे निष्पन्न झाले. मध्यरात्री पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहचले. त्यांनी मुलाची सुटका केली असून त्याला पुण्यात आणले आहे.