Crime News : लग्नाच्या पाचव्याच दिवशी पतीला संपवलं; नंतर सासू-सासऱ्यांना फोन करुन कळवलं

Crime News : लखनऊ- उत्तर प्रदेशच्या मऊमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाला पाच दिवस झाले नाहीत तोच पत्नीने आपल्या पतीचा काटा काढला आहे. लग्नाचे वातावरण अजून पूर्णपणे विरले नव्हते. वधुच्या हाताची मेंहदी देखील अद्याप उतरली नव्हती. मात्र, त्यातच वधूने आपला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या साहाय्याने पतीची हत्या केली आहे.

उसरी विश्वनाथपूरच्या लवकुश चौहान (वय २४) याची १३ फेब्रुवारीला आजमगढच्या छतावार गावातील पायल चौहान सोबत लग्न झाले होते. लग्न धुमधडाक्यात झाले. त्यानंतर पायल आपल्या सासरी आली. दोन दिवसांनी जोडपे नव्या घरी राहिला गेले. शनिवारी लवकुशला काही लोक बाहेर घेऊन गेले. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. याची माहिती पायलने आपल्या सासू-सासऱ्यांना फोन करुन दिली.

नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. त्यानंतर लवकुश याचा मृतदेह काही दूर अंतरावर एका तलावापाशी आढळून आला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु केला. सुरुवातीला पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, काही तासानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समजली.

Wedding

पोलिसांना कळालं की, पायलचे दिनेश यादव नावाच्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. त्यामुळे पायल आपल्या लग्नाने खूष नव्हती. त्यामुळेच तिने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी पतीचा गळा दाबून त्याला संपवलं. मृतदेह आढल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर एक टीम कामाला लावण्यात आली. त्यावेशी प्रियकर दिशेन यादव आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. दिनेश आणि पायल यांना अटक करण्यात आली आहे. इतर काही आरोपींचा शोध घेतला जात आहे.