BIG NEWS : बीडमध्ये अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना – तरुणाला डोंगरात नेऊन बेदम मारहाण, २० जणांवर गुन्हा, ७ जणांना अटक

By: Editor_Pratik

On: Sunday, May 18, 2025 7:45 AM

Google News
Follow Us

BIG NEWS : बीडमध्ये अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना – तरुणाला डोंगरात नेऊन बेदम मारहाण, २० जणांवर गुन्हा, ७ जणांना अटक

परळी (जि. बीड) – जिल्ह्यात पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका किरकोळ वादातून तरुणाला डोंगरात नेऊन निर्घृण मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉड, लाकडी काठ्या, कत्ती आणि बेल्टचा वापर करून ही अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

शिवराज दिवटे हा युवक शुक्रवारी (१६ मे) परळीतील जलालपूर येथील मंदिरात पंगतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. जेवणानंतर तो आपल्या मित्रासह थर्मल रोडमार्गे लिंबुटा गावाकडे जात असताना, एका पेट्रोल पंपासमोर चार दुचाकींवरून आलेल्या युवकांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर जबरदस्तीने त्याला दुचाकीवरून घेऊन जात टोकवाडी रस्त्यावरील डोंगराळ माळाजवळ नेले आणि बेदम मारहाण केली.

या घटनेत पीडित शिवराजला पायावर डोके टेकवण्यास भाग पाडण्यात आले. इतकेच नव्हे तर मारहाणीचा व्हिडिओ शूट करून समाजमाध्यमांवरही व्हायरल करण्यात आला, ज्यामुळे प्रकरण अधिक गाजू लागले आहे.

या घटनेनंतर परळी पोलिसांत खळबळ उडाली असून, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोणे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी तत्परतेने सात आरोपींना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

आरोपींची नावे अशी

समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, संमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गित्ते, सूरज मुंडे व इतर ११ अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व आरोपी टोकवाडी, डाबी, नंदागौळ, परळी परिसरातील रहिवासी आहेत.

शिवराज दिवटे यांच्या जबाबानुसार, कार्यक्रमादरम्यान काही युवकांमध्ये किरकोळ वाद झाला होता, मात्र त्यावरून थेट जीवघेणी मारहाण करण्यात आली. आरोपींनी वापरलेली शस्त्रे – रॉड, कत्ती, लाकडी काठी, बेल्ट इत्यादींचा तपशीलही पोलिसांना मिळाला आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आवाहन

“या घटनेत सात जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. यास जातीय रंग देऊ नये, शांतता राखावी. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे काँवत यांनी स्पष्ट केले.

या अमानुष घटनेमुळे परळी परिसरात संतापाचे वातावरण असून, विविध संघटनांनी याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026