तनिष्कची पेशकश ‘एलान’ – आधुनिक महिलांसाठी सर्वात अनोखे नॅचरल डायमंड स्टेटमेंट

By: Editor_Pratik

On: Friday, May 16, 2025 7:15 AM

Tanishq तनिष्क
Google News
Follow Us

~ आपला स्पॉटलाईट स्वतः तयार करणाऱ्या महिलांसाठी तयार करण्यात आलेलेएलानव्यक्तिगत वैशिष्ट्यांचा फॅशनफॉरवर्ड सोहळा ~

भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य, तनिष्कची नवी प्रस्तुती – ‘एलान’ नैसर्गिक हिऱ्यांचे नवे कलेक्शन तुमच्या सर्वात खास क्षणांना अतिशय शानदार ग्लॅमरने चमकावण्यासाठी सज्ज आहे. आपल्या भावना, विचार न डगमगता सर्वांसमोर मांडणाऱ्या, महत्त्वाकांक्षी आणि ट्रेंड सेट करायला जराही न घाबरणाऱ्या महिलेसाठी तयार करण्यात आलेले ‘एलान’ कलेक्शन म्हणजे केवळ दागिने नाहीत तर घोषणा आहे तिच्या येण्याची! तनिष्कच्या या सर्वात नवीन कलेक्शनमधील डिझाईन खूपच अनोखी आहेत, आकर्षक किमतींचे हे अनोखे कलेक्शन तुमच्या गरजा उत्तम प्रकारे पूर्ण करते.

‘एलान’ चा केंद्रबिंदू आहे एक शक्तिशाली प्रेरणा – तनिष्क महिला. ती बोल्ड, महत्त्वाकांक्षी आहे आणि जगाला आपली चमक दाखवून देण्यासाठी सज्ज आहे. एखादा सोहळा असो किंवा यशाचा टप्पा, एखादी खूप खास संध्याकाळ जरी असेल तरी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, आपले मूल्य सर्वांसमोर प्रदर्शित करण्यासाठी आणि आपली चमक दाखवून देण्यासाठी हे नैसर्गिक हिरे तिचे सर्वात विश्वसनीय साथीदार बनतील. ‘एलान’ कलेक्शन ही भावना प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. फॅशन-फॉरवर्ड, अतिशय अनोख्या प्रकारे शानदार आणि सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. ‘एलान’ कलेक्शन अशा जगाचे दरवाजे खुले करते जिथे सर्वोत्कृष्ट, नाजूक कारीगरी आणि तनिष्क महिलेच्या भावना यांचा संगम झाला आहे.

या कलेक्शनमध्ये ३३ आकर्षक डिझाईन आहेत, ज्यामध्ये स्टेटमेंट नेकलेस, स्कल्पचरल कंगन आणि लेयर्ड पेंडेंट सेट यांचा समावेश आहे. या शानदार कलेक्शनमध्ये जटिल, दोन लेयर्स असलेल्या सोन्याच्या जाळी स्ट्रक्चरसारख्या डिझाईन-फॉरवर्ड तंत्रांचा समावेश आहे, ज्यांच्या स्कल्प्टेड आकृत्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे हे दागिने शरीरावर नैसर्गिक सहजतेने विसावतात.

नाजूक पॅटर्न्स, उमलणाऱ्या फुलांची डिझाइन्स आणि चिल्लई पेव-सेट हिऱ्यांसह हे कलेक्शन आपली चमक सर्वत्र पसरवते. यामध्ये फ्लोरल मोटिफनी ग्लॅमरला अजून जास्त वाढवले आहे. त्यामुळे असे दागिने बनले आहेत जे फ्लुइड, फेमिनाईन आणि फ्लेयरने परिपूर्ण आहेत. हा दर दिवशी परिधान करण्याचा हिरा नाही – ‘एलान’ अशा क्षणांसाठी बनलेले आहे जे खूप खूप खास असतात. दर्जाच्या बाबतीत काहीही तडजोड न करता, तनिष्क जगातील फक्त ५% नैसर्गिक हिऱ्यांना सोर्स करते, ज्यांना त्यांची विलक्षण चमक आणि अतुलनीय तेजासाठी निवडले जाते, त्यामुळे असे दागिने तयार होतात ज्यांची चमक सर्वांचे डोळे दिपवते.  ‘एलान’ फक्त एक कलेक्शन नाही, हा अशा महिलेचा सन्मान आहे जिला माहिती आहे की तिने करून दाखवले आहे आणि तिची इच्छा असते की जगाला हे समजावे.

कलेक्शनच्या लॉन्चविषयी, तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्की त्शेरिंग म्हणाल्या, एलान सोबत आम्ही असे कलेक्शन तयार केले आहे जे अशा महिलेसाठी आहे जी फक्त सजत नाही तर स्वतःसाठी आणि जगासाठी काहीतरी वेगळे करून दाखवते. ती निपुण आहे आणि स्वतःची ओळख घाबरता, डगमगता स्वीकारते. १००% नैसर्गिक हिरे आणि बोल्ड फॅशन फॉरवर्ड डिझाईनचेएलानकलेक्शन तिच्या जीवनातील खास क्षणांना चमकदार बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहेअसे क्षण जे ती इतरांना दाखवू इच्छिते, त्यांचा आनंद साजरा करू इच्छिते आणि त्यांना कायम आठवणीत ठेवावेसे तिला वाटते. हे कलेक्शन तिची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची चमक वृद्धिंगत करते.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026

April 22, 2026