मुंबई, ऑक्टोबर, २०२६: एनपीसीआय (NPCI) द्वारे विकसित केलेले, भारताचे स्वदेशी पेमेंट ॲप ‘भीम’ (BHIM) आपल्या ‘मिठी दिवाळी’ (Meethi Diwali) मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीद्वारे सर्वत्र सण-उत्सवांचा आनंद पसरवत आहे. १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत, वापरकर्त्याने ॲपवर केलेल्या प्रत्येक सातव्या व्यवहाराच्या बदल्यात, ‘भीम’ पेमेंट ॲप गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे संच (स्कूल किट्स) उपलब्ध करून देणार आहे.
या मोहिमेसाठी BHIM ॲपने ‘गूंज’ (Goonj) या नागरी आणि विकासविषयक संस्थेशी भागीदारी केली आहे. ही संस्था शिक्षण, समुदाय विकास आणि आपत्ती निवारण यांसारख्या क्षेत्रात, संपूर्ण भारतभर दर्जेदार उपक्रम राबवण्यासाठी ओळखली जाते.
ही मोहीम ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी ‘भीम’ (BHIM) ॲप निवडण्यास प्रोत्साहित करते, जेणेकरून ते अशा सामूहिक प्रयत्नांचा भाग बनू शकतील, ज्याद्वारे अधिक मुलांपर्यंत आवश्यक शैक्षणिक साहित्य पोहोचवता येईल.
मोहिमेची TVC लिंक: https://youtu.be/00ZhbgFRn4A
एकत्र येण्याचे क्षण, नव्या सुरुवातीचे आश्वासन आणि उत्सव आपल्यापुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे जातो, तेव्हा वाढणाऱ्या सुखात दिवाळीचा खरा आनंद दडलेला आहे. यावर्षी, भीम ॲप हाच स्नेह शाळेतील वर्गांपर्यंत पोहोचवत आहे. शालेय साहित्याच्या किटसारखी साधी गोष्टही वंचित मुलांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकते. हा उपक्रम म्हणजे डिजिटल पेमेंटला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याच्या आणि अर्थपूर्ण बदलासाठी संधी निर्माण करण्याच्या भीम ॲपच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. तसेच, ‘भारत का अपना पेमेंट्स ॲप’मागील मूळ कल्पनेलाही तो बळकटी देतो, की एक साधी, छोटीशी कृतीसुद्धा एका मोठ्या गोष्टीसाठी योगदान देऊ शकते, ज्यामुळे दिवाळीचा उत्साह आणखी दूरवर पोहोचतो.
या उपक्रमावर भाष्य करताना, एनपीसीआय (NPCI) भीम (BHIM) चे बिझनेस प्रमुख गौरव कोचर म्हणाले, “उत्सवाचा खरा आनंद इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यातच असतो, याची आठवण दिवाळी आपल्याला करून देते. ‘मीठी दिवाळी २०२६’ (Meethi Diwali 2026) च्या माध्यमातून, आम्ही डिजिटल पेमेंटसारख्या साध्या गोष्टीला मुलांच्या शिक्षणासारख्या अर्थपूर्ण गोष्टीशी जोडून हा आनंद अधिक व्यापक करू इच्छितो. शिकण्याची, प्रगती करण्याची आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी प्रत्येक मुलाला मिळायला हवी. ‘गूंज’ (Goonj) सोबतची आमची भागीदारी या विचाराला प्रत्यक्षात आणते; याद्वारे भीम ॲपवरील दैनंदिन व्यवहार मुलांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे एक साधन बनतात. ‘भारत का अपना पेमेंट्स ॲप’ (भारताचे स्वतःचे पेमेंट्स ॲप) म्हणून, आमचा असा विश्वास आहे की जेव्हा तंत्रज्ञान लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले जाते, तेव्हा अगदी लहान कृतीतूनही एक अर्थपूर्ण बदल घडवून आणता येतो.”
‘गूंज’ (Goonj) चे संस्थापक आणि कार्यकारी संचालक, अंशु गुप्ता म्हणाले, “BHIM ॲपसोबतची आमची भागीदारी ही दैनंदिन तंत्रज्ञानाच्या व्याप्तीला जागरूक नागरिकांच्या सहभागाशी जोडण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे. दैनंदिन व्यवहारांचे रूपांतर प्रत्यक्ष मदतीत करण्याच्या BHIM ॲपच्या पुढाकाराचे आम्ही स्वागत करतो; यामुळे मुलांना सन्मानपूर्वक आवश्यक शैक्षणिक साधने मिळण्यास मदत होईल.”
‘सोचिअर्स’ (SoCheers) चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), मेहुल गुप्ता म्हणाले, “भारतीय संस्कृतीत एक अशी भावना रुजलेली आहे की, जोपर्यंत आपण आपल्या आनंदातील काही हिस्सा इतरांसोबत वाटून घेत नाही, तोपर्यंत कोणताही उत्सव पूर्ण होत नाही. #मीठीदिवाळी (#MeethiDiwali) मोहिमेच्या निमित्ताने आमच्यासमोर दोन साधे प्रश्न होते: ‘देण्याची’ ही भावना सणासुदीच्या काळाच्या पलीकडे कशी नेता येईल? आणि केवळ एक डिजिटल व्यवहार एखाद्याच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणू शकेल? आजच्या काळात, जेव्हा आपले बहुतेक आयुष्य आपल्या फोनवरच व्यतीत होते, तेव्हा आम्ही अशा एका संधीचा विचार केला, ज्याद्वारे आपल्या दैनंदिन सवयीतून केवळ खरेदीच नव्हे, तर त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आणि मोलाचे काहीतरी साध्य होऊ शकेल.”
‘मीठी दिवाळी २०२६’ च्या माध्यमातून, भीम ॲप डिजिटल पेमेंटला अशा सामाजिक कार्याशी जोडून आपला वार्षिक सणासुदीचा उपक्रम सुरू ठेवत आहे, ज्याचा उद्देश केवळ सणापुरता मर्यादित नाही.





