खळबळजनक! “इस्राइलपासून ते काश्मीरपर्यंत…” पहलगामवरील हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संतप्त निषेध, पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २५ हून अधिक पर्यटक जखमी झाले असून काहींचा दुर्दैवी मृत्यूही झाला. या भयानक घटनेवर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर लोकप्रिय मराठी अभिनेता सुव्रत जोशी यांनी एक भावनिक आणि संतप्त पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. “इस्राइलपासून काश्मीरपर्यंत जगभरातील धर्माच्या नावाखाली माणसं मारली जातात… एकदाचा हा रक्तपात संपावा,” असे म्हणत त्यांनी धर्मांधतेवर आणि मूक समर्थन देणाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.
त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी त्यांच्या परखड विचारांचं कौतुक केलं आहे.