Toxic ingredients in Toothpaste : तुमच्या टूथपेस्टमध्ये विषारी घटकपदार्थ?, ब्रश करण्याआधी 100 वेळा कराल विचार!

By: Editor_Pratik

On: Monday, April 21, 2025 4:45 PM

Toothbrush-1000x600-800x445-1
Google News
Follow Us

Toxic ingredients in Toothpaste : तुमच्या टूथपेस्टमध्ये विषारी घटकपदार्थ?, ब्रश करण्याआधी 100 वेळा कराल विचार!

Toxic ingredients in Toothpaste: दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येकजण ब्रश करतो. यावेळी वापरण्यात येणारी टूथपेस्ट वेगवेगळ्या कंपन्यांची असते. यात कोणी लवंग असल्याचा दावा करतात, कोणी मीठ असल्याचा तर कोणी फ्रेशनेस देण्याचे आश्वासन देतात. पण तुम्ही वापरत असलेल्या टूथपेस्टमध्ये विषारी घटकपदार्थ आहे, असे कोणी सांगितले तर? या विषयाची चर्चा होण्यामागचे कारणंही तसेच आहे. ब्रँडेड टूथपेस्टमध्ये पा-याची धोकादायक मात्रा आढळून आली आहे.

तुम्ही रोज सकाळी टूथपेस्टनं दात घासता. दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरता असं तुम्हाला वाटत असेल. पण सकाळी सकाळी तुम्ही टूथपेस्टच्या नावाखाली धोकादायक शरिरासाठी विष असलेले पदार्थ दातांना लावत असल्याचं वास्तव समोर आलंय. आपण जी टूथपेस्ट दातांना लावतो त्यातील बहुतांश टूथपेस्टमध्ये धोकादायक घटक पदार्थ असल्याची माहिती समोर आलीये.

Toothbrush-1000x600-800x445-1

‘द गार्डियन’ या अंतराष्ट्रीय वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ‘लीड सेफ ममा’ नावाच्या संस्थेनं त्रयस्थ प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनुसार 51 टूथपेस्ट ब्रँडपैकी जवळपास 90 टक्के टूथपेस्टमध्ये पारा आणि आर्सेनिकचं प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचं सांगण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांच्या टूथपेस्टमध्येही धोकादायक धातूंचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं अहवाल सांगतो.

हा अहवाल अमेरिकेतल्या टूथपेस्ट उत्पादनांबाबत होता. अमेरिकेत एफडीएची कठोर मानकं आहेत. अमेरिकेत जर टूथपेस्टमध्ये धोकादायक घटक एवढ्या प्रमाणात असतील तर भारतातल्या टूथपेस्टची तपासणी करण्याची गरज निर्माण झालीये.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026