ऐकावं ते नवलंच, चक्क पीएसआय निघाला चोर, बसस्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चोऱ्या

By: Editor_Pratik

On: Thursday, April 17, 2025 4:25 PM

PSI
Google News
Follow Us

निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या जालन्यातील पोलिस उपनिरीक्षकाला चोरीच्या गुन्ह्यात जळगावात अटक करण्यात आलीये. हा पीएसआय टोळीसह बसस्थानकांत जाऊन सोनसाखळ्यांची चोरी करायचा. चोपडा बसस्थानकात चोरी करून परत जाताना जळगाव पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलंय.

वरिष्ठ क्रिकेटपटूने केली होती शरीरसुखाची मागणी; संजय बांगरचा मुलगा आर्यनने सांगितलं का केला लिंगबदल… उघड केलं भयावह सत्य…

तपास केल्यानंतर सोनसाखळी चोरांच्या टोळीचा म्होरक्या पीएसआय असल्याचे समोर आले. जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे याच्यासह चार जणांना पोलिसांनी पकडलंय. आरोपींडून एक कारसह रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी पीएसआय मान्टेसह, श्रीकांत बघे, अंबादास साळगावकर, रउफ शेख यांना पकडलंय. यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत.

पाण्याचे बिल न भरल्यास नळजोड बंद, फसवणूकीचा नवा प्रकार

अटकेतील पोलिस उपनिरिक्षक प्रल्हाद पिरोजी मान्टे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने बाकी असताना पोलिसाचा हा कारनामा समोर आल्याने खळबळ उडालीये.

PSI

जालन्यातील पोलिस उपनिरिक्षक प्रल्हाद पिरोजी मान्टे याला जळगावातून अटक केल्यानंतर पोलिसदलात खळबळ उडाली. त्यातही बसस्थानकांवरील चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्याने तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहितीही पुढे आलीये. चोरांना पकडणारे पोलिसच चोर निघाल्याने सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगलीये.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now