वरिष्ठ क्रिकेटपटूने केली होती शरीरसुखाची मागणी; संजय बांगरचा मुलगा आर्यनने सांगितलं का केला लिंगबदल… उघड केलं भयावह सत्य…

By: Editor_Pratik

On: Thursday, April 17, 2025 3:17 PM

Anaya Bangar
Google News
Follow Us

Anaya Bangar Opens Up: Harassment, Transition, and Cricket’s Dark Side

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर ( Sanjay Bangar) याचा मुलगा आर्यन याने हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून घेतली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आर्यन हाही क्रिकेट खेळायचा आणि आता त्याने स्वतःची ओळख ट्रान्सपर्सन अशी पटवून दिली आहे. शस्त्रक्रियेच्या १० महिन्यांनंतर क्रिकेटपटूने आर्यनचे नाव बदलून ‘अनाया’ ( Anaya Bangar ) असे केले. त्याने एक इंस्टाग्राम रील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे या १० महिन्यामध्ये झालेले परिवर्तन दिसून आले.

पाण्याचे बिल न भरल्यास नळजोड बंद, फसवणूकीचा नवा प्रकार

अनाया बांगर हिने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत तिच्या या प्रवासाचे धक्कादायक पैलू जगासमोर मांडले. अनायाने सांगितले की, ” काही वरिष्ठ क्रिकेटपटूंना माझ्या ट्रान्स ओळखीबद्दल माहीत झाले होते आणि त्यापैकी एकाने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. काही क्रिकेटर्सनी मला न्यूड फोटो पाठवले आणि त्यांना वाटत होतं की त्यानंतर काहीतरी होईल.” तिने या घटनांबद्दल उघडपणे बोलण्याचे धाडस दाखवले आणि समाजात अशा प्रकरणांवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तिच्या या मुलाखतीने अनेकांना धक्का बसला आहे.

तिने या न्यूड फोटो पाठवणाऱ्यांच्या मॅसेजला उत्तर दिले का? यावर अनाया म्हणाली, “मला फक्त सुरक्षित राहायचं होतं. मला कोणी वाईट नजरेने पाहावं असं वाटत नव्हतं, म्हणून मी संपूर्ण परिस्थितीच टाळली. ही लोकं कधीच माझी मित्र नव्हती. ”

तिने पुढे सांगितले की, मी यूकेमध्ये होते, तेव्हा काही लोक खूप सपोर्टिव्ह होते आणि जे आधी माझ्या पाठीशी होते, ते नंतर बदलले. जे सुरुवातीपासूनच माझ्या विरोधात होते, ते आणखी जास्त विरोधात गेले. ते माझ्या टीममेट्ससमोर मला शिव्या देत होते. म्हणत होते, “हे ट्रान्स-वान्स काय आहे? हे सगळं काही नाही, ही सगळी फालतुगिरी आहे.” आणि मग तोच माणूस नंतर सामन्यादरम्यान माझ्या शेजारी येऊन बसायचा आणि माझ्याकडून माझ्या न्यूड फोटोची मागणी करायचा.

गोष्ट इथेच थांबली नव्हती,अनाया सांगते, ट्रान्स महिलांना खालच्या नजरेने पाहिलं जातं. पण आम्हीही माणूस आहोत आणि फक्त एवढंच वाटतं की आम्हालाही समान सन्मान मिळावा. जेव्हा मी एका जुन्या खेळाडूला माझी खरी ओळख सांगितली, तेव्हा त्याने लगेचच म्हटलं, “चल, तुझ्या गाडीत जाऊया, मला तुझ्यासोबत झोपायचं आहे.” मी खूपच आश्चर्यचकित झाले आणि खूप घाबरले की या व्यक्तीनं माझ्याशी अशी गोष्ट कशी काय बोलली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now