बापरे! भारतात आढळला एचएमपीव्ही चा पहिला रुग्ण, आठ महिन्याच्या मुलीला झाला संसर्ग !

पुणे प्रहार डेस्क – 2020 मध्ये जगभरात कोरोना या विषाणू ने थैमान माजवले होते. आता पुन्हा चीनमध्ये एका नवीन विषाणू ने विळखा घातला आहे. पुन्हा चीन एका धोकादायक व्हायरसमुळे चर्चेत आलेला आहे. चीनमध्ये या व्हायरसने अक्षरशः आहाकार माजवला आहे. ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरसमुळे (HMPV) या व्हायरसमुळे नागरिकांची भीती दिवसेंदिवस वाढली आहे. या व्हायरसमुळे आता अन्य देशांना देखील चिंता सतावू लागलेली आहे अशातच चीनमधील हा व्हायरस आता भारतामध्ये देखील पोहोचलेला आहे. या व्हायरसचा पहिला रुग्ण भारतामध्ये बंगरूळ येथे आढळलेला आहे.

बंगरूळ येथील एका रुग्णालयात चक्क आठ महिन्याच्या मुलीमध्ये हा व्हायरस दिसून आलेला आहे याप्रकरणी आरोग्य विभागाने त्वरित उपचार करण्यास सुरुवात केलेली आहे. आरोग्य विभागाद्वारे या रुग्णाची चाचणी करण्यात आलेली असून याप्रकरणी एक अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या अहवालावर शंका घेण्याचे कोणतेच कारण नाही असे देखील आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हा व्हायरस प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो तसेच सर्व फ्लू नमुनांपैकी 0.7% या व्हायरसचे असतात त्याचबरोबर या व्हायरसचा प्रचार आणि प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे व त्याचबरोबर सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर हा विषाणू कोरोना सारखा घातक नाही आणि म्हणूनच या विषाणूला घाबरू नका. श्वसन संस्थेचा आजार सर्दी, खोकल, ताप येतो. हा व्हायरस शिंका खोकल्यातून पसरतो असे म्हटले गेले आहे त्याचबरोबर चीन, जपान, अमेरिका, कॅनडामध्ये या विषाणूचे रुग्ण पूर्वीपासून सापडत आहे. भारतात यापूर्वी या विषयाने बाधित असलेले रुग्ण कधी सापडले नाही.

हा व्हायरस कोरोना इतका घातक नाही. सर्दी, खोकल्याच्या माध्यमातून या व्हायरसचा प्रसार होतो परंतु सर्दी , खोकला आल्यावर सार्वजनिक स्थळी न जाण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाने केले आहे. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस लवकरच पसरू शकतो म्हणूनच शक्यतो काळजी घेण्याचे मार्गदर्शक तत्व देखील सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे जाहीर करण्यात आले आहेत.