पोलिसात तक्रार केल्याप्रकरणी एका तरुणाने महिलेवर केला ब्लेडने वार, मुलाला जीवे मारण्याची दिली धमकी !

पुणे प्रहार डेस्क – पोलिसात तक्रार केल्याचा राग मनामध्ये ठेवून एका तरुणाने महिलेवर ब्लेडने वार केलेला आहे. एका माथेफिरू तरुणाने ब्लेडचा वार केल्यानंतर घरामध्ये घुसून त्या महिलेला लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या सर्व घटनेमुळे पूर्ण कुटुंब दहशतीखाली आले त्यानंतर या कुटुंबाने पोलीस स्टेशनला धाव घेतली.

घडलेल्या घटना प्रकरणी कोंढवा पोलिसांनी मोहम्मद जानी जिलानी शेख याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणा बद्दल आश्रफनगर कोंढवा येथील २६ वषीय महिलेने फिर्याद दिली आहे. आश्रफनगर कोंढवा परिसरात घडला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तक्रारदार महिलेचा पती मुलीला शाळेत जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल असताना अशा वेळी महिला घरी दोन मुलांसोबत एकटीच होती. दुपारी दीड वाजण्याच्या वेळी मोहम्मद तक्रार दार महिलेच्या च्या घरी आला आणि पूर्वी गुन्हा दाखल केल्याचा राग मनामध्ये असल्याकारणाने फिर्यादीच्या गालावर, उजव्या हाताच्या, मनगटावर, पोटरीवर गळ्यावर आणि ओठावर, नाकावर ब्लेडने वार केले त्यानंतर या महिलेला लाथा बुक्क्याने मारहाण देखील केली.

या सर्व घटने प्रकरणी तक्रार महिलेने आरडाओरड करायला सुरुवात केली. ही घटना शेजाऱ्यांना समजताच शेजारी धावून आले आणि त्यांनी आरोपीला पकडून ठेवले. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक हसीना शेख करत आहेत. घडलेल्या सर्व प्रकरणाबाबत कुटुंब पूर्णपणे भीतीदायक वातावरणात जगत आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केलेली असून लवकरच त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.