HMD कंपनीने लाँच केला खिश्याला परवडेल असा स्मार्ट फोन, फीचर्स पाहून व्हाल दंग!…

पुणे प्रहार डेस्क – नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक मोबाईल कंपन्यांनी त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत आणि म्हणूनच मोबाईल प्रेमींना हे नवीन वर्ष अत्यंत आनंददायी व लाभदायी ठरणार आहे त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. जर तुम्ही देखील मोबाईल प्रेमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या सर्वांना नोकिया ब्रँड माहितीच आहे.

आतापर्यंत नोकियाने अनेकांच्या हृदयावर राज्य केलेले आहे. नोकिया ब्रँडचे फोन बनवणाऱ्या एचएमडी कंपनीने आपला नवीन एचएमडी की हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केलेला आहे. या नवीन स्मार्टफोनमुळे नोकियाच्या मॉडेलमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. हा फोन विशिष्ट निवडक बाजारपेठांमध्ये लॉन्च केला जात आहे तसेच नोकिया कंपनीचा हा नवीन फोन अँड्रॉइड फोर्टीन गो एडिशन फीचरने उपयुक्त असा आहे.

या स्मार्टफोन मध्ये असलेले स्पेसिफिकेशन तुम्हाला थक्क करणारे आहेत. कमी किंमतीमध्ये पण जास्तीत जास्त फीचर्स उपलब्ध करणारा हा मोबाईल फोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा आहे.

स्पेसिफिकेशन

6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले
60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट
क्वाड कोड Unisoc 9832E प्रोसेसर
460 Nits च्या पीक ब्राइटनेस
Unisoc 9832E क्वाड कोर प्रोसेसर
2GB रॅम आणि 32GB स्टोरेज
मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येते.

ड्युअल सिम सपोर्ट
हँडसेट Android 14 (Go Edition)
8MP ऑटो फोकस रियर कॅमेरा आहे, जो LED फ्लॅशसह येतो.
5MP सेल्फी कॅमेरा

स्मार्ट फेस अनलॉक फीचर
3.5 मिमी ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ आणि खाली पोर्टेड स्पीकर
4000mAh बॅटरी , जी 10W चार्जिंग सपोर्ट

हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये मिळत आहे. IC ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक हे दोन पर्याय असणार आहेत.

अशा विविध उपयुक्त फीचर्स मुळे या फोनला भविष्यात नक्कीच पसंती मिळेल असे म्हटले जात आहे. तुम्ही देखील जवळच्या बाजारपेठेमध्ये जाऊन या मोबाईल बद्दल चौकशी करू शकता तसेच ऑनलाईन देखील या मोबाईल फोन बद्दल माहिती उपलब्ध केली गेलेली आहे.