मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वृक्षारोपण अभियान

By: Editor_Manas

On: Friday, June 5, 2026 10:18 AM

Google News
Follow Us

पिंपरी-चिंचवड : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरण दिनी वसुंधरा संवर्धनाचा संदेश दिला आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वाखाली “मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण” या अभियानांतर्गत शहरातील विविध मंडलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. इंद्रायणीनगर-नेहरूनगर मंडल, मोशी-चऱ्होली मंडल, दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती मंडल तसेच चिखली-कृष्णानगर मंडल येथे कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी महापौर रवि लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, सरचिटणीस विकास डोळस, मंडलाध्यक्ष प्रमोद परदेशी, शिवराज लांडगे, अजय साने, अजित बुर्डे, नगरसेवक व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक बूथ स्तरावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी “राष्ट्र प्रथम” या संकल्पनेसोबत सातत्याने सेवा देत आहेत. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या ऐतिहासिक कामगिरीची १२ वर्षे दि. ७ जून २०२६ रोजी पूर्ण होत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य करीत आहेत. तसेच “विकसित भारत” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी वेगाने पुढे जात आहेत. आपले राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीन जी यांच्या नेतृत्वात तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात “मोदी सरकारची १२ वर्षे विश्वास, विकास, जनकल्याण” अभियानातंर्गत ५ जून, २०२६ ते २१ जून २०२६ या काळात विविध कार्यक्रमांची योजना ठरली आहे.

“पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून वृक्षारोपणाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.” भाजपाच्या “विश्वास, विकास व जनकल्याण” अभियानांतर्गत आगामी काळात विशेष जनसंपर्क अभियान, जनकल्याण शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा तसेच जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now