---Advertisement---

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी पोलीस, प्रशासन, शिक्षण विभाग आदी सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

By: Editor_Manas

On: Friday, August 16, 2024 3:44 PM

Google News
Follow Us
---Advertisement---

पुणे – राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या २१ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी, चिंचवड, जुन्नर, भोर, शिरवळ, राजगुरुनगर, थेरगाव, पारगाव, कोथरुड, कात्रज आदी 70 हून अधिक शाळांमध्ये निवेदन दिले. त्यासमवेत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली, यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर राष्ट्रजागृतीपर ध्वनीचकत्या (सीडी) दाखवणे, विविध ठिकाणी प्रबोधन कक्ष लावून राष्ट्रध्वजाचे महत्व विषद करण्यात आले. याशिवाय फलक लिखाण, सामाजिक माध्यमाद्वारे जनप्रबोधन करणे आदी गोष्टी करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी, पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आदी ठिकाणीही ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा!’ याविषयी निवेदने देण्यात आली. ९ ऑगस्ट या दिवशी पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम,  मा.शिक्षण आयुक्त, तसेच पुणे पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. बिबवेवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार श्रीरंग लोंढे तसेच पर्वती पोलीस ठाणे अंमलदार यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानेही राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करत आहोत, असे सांगितले. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रतिज्ञा घेण्यात आली. मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी विविध शाळांमध्ये क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले. पुणे जिल्ह्यात ही चळवळ यशस्वी होण्यासाठी समाजातील राष्ट्रप्रेमी नागरिक, हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण वर्गातील अन् शाखेतील धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026