क्या बात है… ३१ डिसेंबरसाठी सर्वात मोठा निर्णय; रात्रभर…
मुंबई : राज्यभरात सध्या नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. नाताळच्या निमित्ताने अनेक खासगी कार्यालयांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे कर्मचारी सुट्टींचा आनंद घेण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळी गेले आहेत. दरवर्षी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरीक रात्री उशिरापर्यंत जागतात.
मुंबईत तर गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, गोराई, मढ, दादर चौपाटी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची तुफान गर्दी होते. सरत्या वर्षाला बायबाय आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई उपनगरातील लाखो नागरीक, तरुण-तरुणी मुंबईच्या चौपाट्यांवर दाखल होतात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
थर्टीफर्स्टच्या निमित्ताने 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईत येणाऱ्या नागरिकांना रात्री उशिरा परत घरी जाण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 4 विशेष उपनगरीय रेल्वे चालविणार आहे. त्यामुळे मुंबईत रात्री उशिरा सेलिब्रेशनला येणाऱ्या नागरिकांना, तरुण-तरुणींना घरी परत जाण्यासाठी मोलाची मदत होणार आहे.
गुन्हेगाराने पोलिसांवर सोडले कुत्रे
खरंतर थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या दिवशी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना हे एक गिफ्ट देण्यासारखंच आहे. मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन म्हणतात. मुंबईकर या लोकलच्या बाबतीत खूप संवेदनशील आणि हळवा आहे. दसरा, दिवाळीला मुंबईकर आणि उपनगरात वास्तव्यास असणारे प्रवासी मुंबई लोकलची पुजा करतात. याची जाणीव रेल्वे प्रशासनाला देखील असल्याची यातून दिसून येत आहे.
#BIG NEWS Ajit Pawar : अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार?
मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री) प्रवाशांकरीता खालीलप्रमाणे विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ /१.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
कल्याण येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
पनवेल येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२२/१.१.२०२३ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील. प्रवाशांनी याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, असं मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.