#BIG NEWS Ajit Pawar : अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार?

मुंबई : तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभे राहता येणार नाही. पुढील ४ महिन्यांत अजित पवार (Ajit Pawar) तुरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. शालिनीताई पाटील (Shalini Patil) या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत.

ajit pawar

शालिनीताई पाटील म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढील मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील. कारण, शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena), बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. त्यांना सरकार चालवता येत नाही.

Crime : वाढदिवसाला सरप्राईज देतो म्हणून बोलावलं; हात-पाय बांधून IT प्रोफेशनल मैत्रिणीला जिवंत जाळलं

(Shalini Patil) शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या, राज्यात याचे बंड, त्याचे बंड, ग्रामसेवकांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, मराठवाड्यातला दुष्काळ, कांदा आणि ऊसाचा प्रश्न, अशा कुठल्याही प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांना तोडगा काढता आलेला नाही.

Gautami Patil : गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर? व्हिडीओ एकदा पहाच!

शालिनीताई पाटील म्हणाल्या, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले. हा कांदा निर्यात करायला हवा. परंतु, केंद्राने निर्यातबंदी लागू केली आहे. ही निर्यातबंदी उठवण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी १० वेळा शब्द दिला. ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांना भेटायला गेले. पण शाहांनी त्यांची भेट घेतली नाही.