Pune Crime : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, चाैघांना अटक

पुणे : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह तिघांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करीत दहशत पसरविल्याप्रकरणी चौघांना चंदननगर (Pune Crime) पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.२४) रात्री पावणेबारा वाजता वडगाव शेरी भागात घडली.

#BIG NEWS Ajit Pawar : अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार?

याप्रकरणी सौरभ पाडळे (वय २२, रा. वडगाव शेरी) याने फिर्याद दिली असून, अनुज जितेंद्र यादव (वय १९, रा. ओम गंगोत्री सोसायटी, वडगाव शेरी), हरिकेश टुणटुण चव्हाण (वय १८, रा. ओंकार सोसायटी, वडगाव शेरी), आकाश भारत पवार (वय २३, रा. श्रीनगरी सोसायटी, वडगाव शेरी) आणि अमोल वसंत चोरघडे (वय ३०, रा. राजश्री काॅलनी वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Crime : वाढदिवसाला सरप्राईज देतो म्हणून बोलावलं; हात-पाय बांधून IT प्रोफेशनल मैत्रिणीला जिवंत जाळलं

फिर्यादी यांचा मित्र ऋषिकेश यांची आकाश पवार यांच्यासोबत झालेली भांडणे मिटविण्यासाठी गेला असता आकाश याने ऋषिकेशच्या कानाखाली मारली. त्याचवेळी अनुज यादव याने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी हत्याराने ऋषिकेश याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मनगट आणि डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. आरोपींनी मोठमोठ्याने शिवीगाळ करून या कुणालाच सोडू नका, असे म्हणून तिथे पडलेल्या दगड व विटांनी मारहाण केली.

Gautami Patil : गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर? व्हिडीओ एकदा पहाच!

तसेच फिर्यादी व इतर मित्र ऋषिकेशला वाचविण्यासाठी गेले असता, अनुज याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने फिर्यादीसह त्याच्या इतर दोन मित्रांवर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या हातामध्ये असलेले लोखंडी हत्यारे हवेत फिरवून कुणीमध्ये आले तर सोडणार नाही असे म्हणून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपींवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश घोरपडे पुढील तपास करीत आहेत.