पुणे : दोन दिवसीय ‘ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन’ दि.८,९ जून रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.श्री ज्योतिष संशोधन केंद्र,अभिजीत प्रतिष्ठान-द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट(मुंबई),द लीला टॅरो(पुणे) या संस्थांनी द प्रेसिडेंट हॉटेल(प्रभात रस्ता) च्या सभागृहात या अधिवेशनाचे आयोजन केले आहे.दि.८ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता या अधिवेशनाचे उदघाटन चितळे उद्योग समूहाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्याहस्ते होणार असून प्राचार्य ज्योतिर्विद रमणलाल शहा(सातारा) हे उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
अधिवेशनाचे आयोजक ॲस्ट्रोगुरु डॉ.सौ.ज्योती जोशी तसेच हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या अधिवेशनाचे हे चौथे वर्ष आहे.ज्योतिर्विद श्रीमती रजनी साबदे या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष आहेत.गोविंद कुलकर्णी(राष्ट्रीय अध्यक्ष,अ.भा. ब्राह्मण संघ),आनंद दवे(अध्यक्ष,हिंदू महासंघ),ज्योतिर्विद श्री. आदिनाथ साळवी,ज्योतिर्विद सुनिल पुरोहित,ज्योतिर्विद ॲड.सौ.सुनिता पागे,रेसिपी तज्ज्ञ सौ.मधुरा बाचल हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.
फलज्योतिष अभ्यास मंडळ (पुणे),आदिशक्ती गुरुकुल, (सासवड),श्री मोहिनीराज ज्योतिष कार्यालय (नंदुरबार),मुळे ज्योतिष व वधु-वर केंद्र (तळेगाव दाभाडे) या संस्था आणि राज्यभरातील ज्योतिष अभ्यासक सहभागी होणार आहेत. ज्योतिषविषयक अनेक व्याख्याने आयोजित करण्यात आली असून अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.