सूर्यपुत्र, न्यायदाते आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेव यांची महागाथा

By: Editor_Manas

On: Saturday, May 4, 2024 8:31 AM

Google News
Follow Us
पुणे, ४ मे २०२४ : सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. ‘जय जय शनिदेव’ असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारतो आहे. याआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेत. पण प्रमुख भूमिका म्हणून ‘शनिदेव’ ही संकेतची पहिलीच भूमिका आहे. विशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगरचा असून ‘जय जय शनिदेव’ मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी  ‘जय जय शनिदेव’ मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.
शनिदेव यांच्यावर आधारित मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. सूर्यपुत्र, न्यायदाते, आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेव यांची महागाथा ८ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्याच दिवशी १ तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शनिदेवांचे निरनिराळे अध्याय या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडले जातील. विक्रमादित्य यांची गोष्ट आपल्याला मालिकेच्या सुरुवातीच्या भागांत पाहायला मिळणार आहे. शनिदेवांच्या भूमिकेत अभिनेता संकेत खेडकर दिसणार आहे तर महादेवांच्या भूमिकेत अभिनेता त्रिशुल मराठे आपले पदार्पण करत आहे. संतोष अयाचित यांच्या लेखणीच्या पेटार्‍यातून आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांच्या लेखणीतून ‘जय जय शनिदेव’ मालिकेचे लेखन होणार आहे. संतोष अयाचित हे मालिकेचे निर्माते देखील आहेत.
जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांचा जीवनप्रवास या मालिकेतून ८ मे पासून सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. पाहायला विसरू नका,  ‘जय जय शनिदेव’, ८ मे पासून रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026