अमेरिका (जर्सी सिटी, NJ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेमध्ये आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जर्सी सिटी मधील सिटी हॉलमध्ये विशेष ध्वजारोहन करण्यात आले. या समारंभात अमेरिकेच्या राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीने सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या निळा ध्वजाचेही दिमाखात ध्वजारोहन करण्यात आले. त्यामुळे शहराच्या समानतेच्या तत्त्वांशी एकता दर्शवणारा एक आनंदाचा क्षण होता. कार्यक्रमाप्रसंगी कौन्सिलवुमन मीरा प्रिंझ-एरे आणि कौन्सिलमन जेम्स सोलोमन उपस्थित होते. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी हा ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडतो. ध्वजारोहनाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM) ही भारताबाहेरील आंबेडकरी जनतेची सर्वात जुनी संघटना, जर्सी सिटी हॉलच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत जेंव्हा डौलाने फडकला निळा झेंडा..
By: Editor_Manas
On: Monday, April 15, 2024 5:03 PM
cafes in pune, chimney cone in pune, eateries in pune, fergusson college pune history, fergusson pune, hotels in pune, khau gali in pune, pin code of pune, places to eat in pune, planespotting in pune, planespotting pune, pune, pune airport, pune airport guide, pune airport inside, pune cafes, pune city, pune planespotting, pune station, pune sunburn, pune tourism, puneri patya, star pravah, sunburn pune, tourist places in pune, vaibhav pune ka rider





