उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. रोजचे उन बऱ्यापैकी तापायला लागले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये मध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही उन्हाळाही चांगला घालवू शकाल, उन्हाळ्यात आरोग्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे.
त्या साठी काहीजण दोन ते तिन लीटर पाणी पितात. उन्हाळ्यात घाम येतो. तसेच व्यायाम केल्यानेही पाण्याची गरज आणि प्रमाण वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.
हृदय फिट आणि हेल्दी राहण्यासाठी जिम व मैदानात चालणे, पळणे व्यायाम फायद्याचा आहे तसेच सायकलिंग, पोहणे, टेनिस सारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी उन्हाळा हा योग्य हंगाम आहे. यामुळे तुमचे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होईल. उन्हाळ्यात शारीरिक उर्जा जास्त लागते. त्यामुळे पौष्टीक आणि पूरक आहाराचा समावेश करा जसे पालेभाज्या, फळभाज्या व फळे खा, जास्त मसालेदार खाऊ नका की ज्याने शरीरातील उष्णता वाढेल व त्रास होईल तसेच उन्हाळ्यात बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे, सोबत चांगली झोप सुद्धा घ्या तर सर्व हे आमलात आणा व उन्हाचा त्रास कमी करून घ्या.