मुंबई | मार्च 2024: भारतातील सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक प्लॅटफॉर्म अपस्टॉक्सने आज ‘कट द किट किट, गेट इन द मार्केट’ या नाविन्यपूर्ण ब्रँड मोहिमेचे अनावरण केले. किरकोळ गुंतवणूकदारांना अतिरिक्त माहितीच्या त्रासातून बाहेर काढत योग्य गुंतवणूक करण्यासाठी मदत करणे हे अपस्टॉक्सचे उद्दिष्ट आहे.
कंपनीने केलेल्या संशोधनानुसार, गुंतवणूकदारांना अनेकदा विक्रीची चुकीची पद्धत, भरपूर माहिती आणि इतर पर्यायांची उपलब्धता, तसेच तांत्रिक शब्द समजून घेणे यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो, हे अपस्टॉक्सला कळले आहे.
उदाहरणार्थ, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार अनेकदा आवश्यक जोखीम आणि खर्चाच्या मेट्रिक्सपेक्षा परताव्यांना प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे सगळ्याला एकच निकष या न्यायाने योग्य मूल्यांकन न करताच ते 1 कोटी रु. टर्म इन्शुरन्स योजनेची निवड करू शकतात. अशा पद्धतींमुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, ज्यामुळे गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास कमी होतो. ही आव्हाने ओळखून, अपस्टॉक्सने आपल्या ग्राहकांसाठी हेवी लिफ्टिंग आणि क्लिष्ट व्यवहार हाताळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीला मार्केटमधील ही “कट द किट-किट” (आवाज) कमी करायची आहे आणि ग्राहकांना त्यांच्यासाठी जे योग्य आहे त्यात गुंतवणूक करून अधिकाधिक आणि सुरक्षित निधी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे.
हा संदेश गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपस्टॉक्सने “कट द किट किट, गेट इन द मार्केट” या संकल्पनेवर आधारित एक कॅम्पेन व्हिडिओ लॉन्च केला आहे. या व्हिडिओमध्ये, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा कलाकारांकडून उल्लेख होताच प्रेक्षकांकडून “किट किट” चा प्रतिसाद येतो. गुंतवणूक करू पाहणाऱ्या या गोंधळलेल्या नायकाची अपस्टॉक्सशी ओळख होईपर्यंत तो गोंधळलेलाच राहतो. अपस्टॉक्सबाबत कळताच त्याला टॉप -रेट म्युच्युअल फंडांची माहिती मिळते, जी त्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
पुढील काही आठवड्यांत आणखी दोन व्हिडिओ लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य माहितीसाठी लोक कसे संघर्ष करतात याचे चित्रण यात असेल. परंतु अपस्टॉक्स त्यांचा हा त्रास संपवून ग्राहकांना आवश्यक पण महत्त्वाची तेवढीच माहिती देत योग्य गुंतवणुकीचे मार्गदर्शन करतील.
या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी, अपस्टॉक्सच्या सह-संस्थापक कविता सुब्रमण्यम म्हणाल्या, “भारत हे परंपरेने गुंतवणूकदारांऐवजी बचतीला प्राधान्य देणाऱ्यांचे राष्ट्र आहे. गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय घेतले जाण्यामागे स्पष्ट, सुलभ माहितीचा अभाव हा एक महत्त्वाचा अडथळा आहे. प्रत्येक भारतीयाला योग्य ज्ञान आणि साधनांसह सक्षम बनवणे, सर्व उत्पन्न गटातील प्रत्येक माणूस गुंतवणूक करू शकेल, अशा पद्धतीने अडचणी टाळून हुशारीने गुंतवणूक करण्यास सक्षम करणे, हे अपस्टॉक्सचे ध्येय आहे.”
ही मोहीम अपस्टॉक्सच्या मजबूत प्लॅटफॉर्म ऑफरिंगवर प्रकाश टाकते
क्युरेटेड टॉप फंड्स : परतावा आणि जोखमीचा संतुलित अभ्यास करून लोकप्रिय श्रेणींमध्ये म्युच्युअल फंडांची निवड करणे
ध्येय-आधारित गुंतवणूक : वैयक्तिक जीवनातील उद्दिष्टांसाठी तयार केलेले वैयक्तिक गुंतवणूक उपाय.
माहितीपूर्ण स्टॉक निवड : विश्लेषक रेटिंग आणि स्टॉक्स स्मार्टलिस्ट सारखी वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना विश्वासार्ह स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन
गुंतवणुकीचे विविध पर्याय : म्युच्युअल फंड बास्केटपासून ते सोन्याच्या गुंतवणुकीपर्यंत आणि निश्चित उत्पन्नाच्या संधींपर्यंत, अपस्टॉक्स गुंतवणुकीचे विस्तृत मार्ग ऑफर करते.
SIP सह सरल गुंतवणूक : शिस्तबद्ध गुंतवणुकीसाठी स्टॉक, ETF आणि म्युच्युअल फंडांमध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना
सर्वसमावेशक वेल्थ ट्रॅकिंग : वेल्थ ट्रॅकर वैशिष्ट्य वापरकर्त्यांना बँक खाती, बाह्य स्टॉक आणि म्युच्युअल फंड सिंक्रोनाइझ करून त्यांचा आर्थिक पोर्टफोलिओ एकत्र करण्यास सक्षम करते, ज्यामुळे एकाच ॲपवर बचत आणि गुंतवणुकीचा एकत्रित आढावा मिळू शकतो.
या प्लॅटफॉर्मसह, Upstox वापरकर्त्यांना मार्केटमधील अनावश्यक चर्चा कमी करून गुंतवणूकीचे योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आणि बचत, गुंतवणूक, ट्रेडिंग यांच्या साहाय्याने सर्वांगीण संपत्ती मिळवून देणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचा त्यांचा हेतू आहे.
ही मोहीम सध्या डिजिटल, टीव्ही आणि सोशल मीडियावर पसरली आहे. IPL साठी JioCinema आणि Star यांच्यासोबत केलेल्या भागीदारीसह Upstox हे महानगरांपासून टियर 3 शहरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे. 1.3 कोटींहून अधिक ग्राहकांसह, Upstox नवशिक्या गुंतवणूकदार आणि प्रगत व्यापाऱ्यांसाठी ‘इन्व्हेस्ट’ आणि ‘प्रो’ मोड ऑफर करते आहे.