व्यापाऱ्यावर खुनीहल्ला

थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने पाचजणांना एका व्यापाऱ्याच्या खुनाची सुपारी दिली. त्यातूनच हल्लेखोरांनी संबंधित व्यापाऱ्यावर पिस्तुलाने गोळीबार करून कोयत्यानेही हल्ला केल्याची घटना माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात घडली आहे.

सोलापूर : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने पाचजणांना एका व्यापाऱ्याच्या खुनाची सुपारी दिली. त्यातूनच हल्लेखोरांनी संबंधित व्यापाऱ्यावर पिस्तुलाने गोळीबार करून कोयत्यानेही हल्ला केल्याची घटना माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात घडली आहे. याप्रकरणीसंबंधित सावकारासह इतरांविरूध्द टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल महादेव पवार (वय ३५, रा. टेंभुर्णी) असे या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने स्वतःची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी श्रीरंग रमेश थोरात नावाच्या खासगी सावकाराकडून १२ लाख कर्ज घेतले होते. परंतु कर्जाचे हप्ते व्याजासह देऊनसुध्दा कर्जाची थकबाकी राहिल्याने श्रीरंग थोरात याने पाचजणांना राहुल पवार यांच्या खुनाची सुपारी दिली होती. राहुल पवार हे सायंकाळी आपल्या जगदंब व्हेजिटेबल दुकानात बसले असताना मोटारीतून आलेल्या पाचजणांनी खून करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला. एकाने पिस्तुलातून गोळीबार केला. तर दुस-याने कोयत्याने त्यांच्या डोक्यात प्रहार केला.