सोनीकडून एक्‍सआर प्रोसेसर आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह BRAVIA 3II सादर; BRAVIA 3 सिरीजमध्ये इंटेलिजेंट पिक्चर परफॉर्मन्सच्या नव्या पर्वाचा प्रारंभ

By: Editor_Manas

On: Tuesday, May 12, 2026 4:47 PM

Google News
Follow Us

नवी दिल्ली, १२ मे २०२६: सोनी इंडियाने आज BRAVIA 3II लाँच करण्याची घोषणा केली, जी ग्राहकांच्या घरगुती मनोरंजनाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल. सोनीच्या प्रीमियम टेलिव्हिजन श्रेणीतील एआय प्रगत एक्‍सआर प्रोसेसरची ताकद आता भारतातील जास्तीत-जास्त घरांपर्यंत पोहोचवत, या अपग्रेडद्वारे इंटेलिजेंट पिक्चर प्रोसेसिंगला पाहण्याच्या अनुभवाच्या केंद्रस्थानी आणले गेले आहे. ब्राव्हियाचा AI एक्‍सआर प्रोसेसर कंटेंटचे विश्लेषण माणसांच्या पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या पद्धतीनुसार करतो, ज्यामुळे अधिक डेप्थ, कॉन्ट्रास्ट, रंग आणि स्पष्टतेसह अत्यंत वास्तववादी दृश्ये अनुभवता येतात. एक्‍सआर त्रिल्युमिनोस प्रो, डॉल्बी व्हिजन®, डॉल्बी ॲटमॉस®, डीटीएस:एक्‍स® आणि ४के १२०  हर्ट्झ परफॉर्मन्ससह, BRAVIA 3II सिनेमॅटिक चित्र, तल्लीन करणारा आवाज आणि वेगवान गेमिंगचा असाधारण अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

BRAVIA 3II: सुस्पष्ट आवाज आणि इन्ट्युटिव्ह एआयसह चमकदार, उठावदार आणि वास्तववादी रंग

ही गती कायम राखत, सोनी इंडिया विविध आकारांतील स्क्रीन्ससह नवीन BRAVIA 3II लाइनअप सादर करण्यास सज्ज आहे. घरगुती मनोरंजनाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी हे मॉडेल्स टप्प्याटप्प्याने लाँच केले जातील. ५५-इंच आणि ६५-इंच मॉडेल्सपासून सुरुवात करून, त्यानंतर मोठ्या आकाराचे टीव्ही लाँच होतील आणि जुलै ते ऑगस्ट दरम्यान या सिरीजमध्ये १००-इंचाचा भव्य प्रकार सादर केला जाईल. एक विशाल आणि तल्लीन करणारा व्ह्यूइंग कॅनव्हास प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेला १००-इंचाचा BRAVIA 3II, “सिनेमा इज कमिंग होम” या अनुभवाला एका नव्या उंचीवर नेईल, ज्यामुळे चित्रपटगृहाचा भव्य अनुभव आता पूर्वी कधीही नव्हता तसा प्रत्‍यक्ष लिव्हिंग रूममध्ये मिळेल.

प्रगत AI एक्‍सआर प्रोसेसरसह, BRAVIA 3II उत्कृष्ट पिक्चर क्वालिटीसह दृश्ये सादर करतो

सोनीच्या प्रगत एक्‍सआर प्रोसेसर द्वारे समर्थित, BRAVIA 3II मानवी दृष्टी आणि आवाजाच्या नैसर्गिक आकलनाच्या पद्धतीनुसार कंटेंटचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संज्ञानात्मक बुद्धिमत्तेचा संगम साधतो. यामुळे टेलिव्हिजनला रिअल टाइममध्ये डेप्थ, रंग आणि स्पष्टता वाढवणे शक्य होते, ज्यामुळे अधिक नैसर्गिक आणि वास्तववादी दृश्ये मिळतात. एक्‍सआर त्रिल्युमिनोस प्रो मुळे, BRAVIA 3II रंगांची विस्तृत श्रेणी अत्यंत अचूकतेने सादर करतो, ज्यामुळे अब्जावधी शेड्स, अधिक गडद काळा रंग आणि उजळ हायलाइट्ससह दृश्ये जिवंत वाटतात. एक्‍सआर क्लियर इमेज आवाजातील व्यत्यय आणि धूसरपणा कमी करून स्पष्टता अधिक वाढवते, ज्यामुळे वेगवान दृश्यांमध्येही प्रत्येक फ्रेम अधिक तीक्ष्ण आणि सविस्तर दिसते. मोशनफ्लो एक्‍सआरमुळे हालचाली अधिक गुळगुळीत आणि प्रवाहित राहतात, ज्यामुळे चित्रपट, क्रीडा आणि गेमिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक तल्लीन करणारा होतो.

डॉल्बी व्हिजन आणि ॲटमॉससह सिनेमॅटिक एचडीआर दृश्ये आणि बहुआयामी सराउंड साउंडचा अनुभव घ्या

डॉल्बी व्हिजन® आणि डॉल्बी ॲटमॉस® मुळे, BRAVIA 3II घरामध्ये खऱ्या अर्थाने सिनेमागृहासारखा अनुभव देतो. ग्राहक आता अधिक समृद्ध रंग, खोल कॉन्ट्रास्ट आणि सुधारित ब्राइटनेससह पिक्चर क्वालिटीचा अनुभव घेऊ शकतात, सोबतच तल्लीन करणाऱ्या स्पेशिअल ऑडिओमुळे प्रेक्षक प्रत्येक दृश्यात अधिक खोलवर गुंतले जातात.

हा टीव्ही विशिष्ट पद्धतीने डिझाइन केलेल्या स्पीकर्सने सुसज्ज आहे, जे आवाजातील व्‍यत्‍यय कमी करतात आणि साउंड रिझोल्युशनमध्ये सुधारणा करतात. यामुळे वापरकर्त्यांना चित्रपट, शोज आणि गेम्समध्ये अधिक स्पष्ट संवाद आणि अधिक प्रभावी ऑडिओ अनुभवाचा आनंद घेता येतो

४के १२० हर्ट्झ आणि प्रगत गेमिंग वैशिष्ट्यांसह पुढच्या पिढीतील गेमिंगसाठी सज्ज

BRAVIA 3II मध्ये एचडीएमआय २.१ द्वारे १२० एफपीएसवर ४के सपोर्ट देण्यात आला आहे, जो अत्यंत प्रवाही आणि प्रतिसाद देणारा (responsive) गेमप्ले सुनिश्चित करतो. ऑटो लो लेटन्सी मोड (एएलएलएम) आणि व्हेरिएबल रिफ्रेश रेट (व्हीआरआर) यांसारखी वैशिष्ट्ये इनपुट लॅग कमी करतात आणि स्क्रीन टिअरिंगची समस्या दूर करतात, ज्यामुळे अतिशय गुळगुळीत गेमिंग कामगिरी मिळते.

एका समर्पित गेम मेनूमुळे, वापरकर्त्यांना एक सोयीस्कर क्विक-ॲक्सेस कंट्रोल पॅनल मिळते. यामुळे गेम कन्सोल कनेक्ट असताना गेमिंग सेटिंग्समध्ये त्वरित बदल करणे आणि साहाय्यक वैशिष्ट्ये सक्रिय करणे सोपे जाते. डॉल्बी व्हिजन®गेमिंग प्रगत एचडीआर प्रोसेसिंगचा वापर करून अधिक समृद्ध, उजळ रंग आणि खोल कॉन्ट्रास्ट प्रदान करते, ज्यामुळे गेममधील जग अधिक तल्लीन करणारे आणि सिनेमॅटिक वाटते.

याव्यतिरिक्त, पीएस रिमोट प्ले आणि प्लेस्टेशन ५ साठी केलेल्या विशेष ऑप्टिमायझेशनमुळे, कन्सोल गेमिंग प्रेमींसाठी BRAVIA 3II हा एक आदर्श पर्याय ठरतो. १२० एफपीएसवर ४के, VRR आणि ALLM ला सपोर्ट करणाऱ्या चार एचडीएमआय २.१ पोर्ट्सनी सुसज्ज असलेला BRAVIA 3II एक स्‍मूद, प्रतिसाद देणारा आणि अत्यंत प्रभावी गेमिंग अनुभव सुनिश्चित करतो.

गुगल टीव्हीसह अखंड मनोरंजनाचा आनंद घ्या

गुगल टीव्हीवर आधारित, BRAVIA 3II मध्ये ४,००,००० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोजसह हजारो ॲप्स आणि गेम्स उपलब्ध आहेत. यामुळे विविध प्लॅटफॉर्मवर न जाता सहज आणि सोप्या पद्धतीने आवडीचा कंटेंट शोधणे शक्य होते. वैयक्तिक शिफारसी आणि समर्पित युजर प्रोफाइल्समुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार आशय त्वरित शोधण्यात मदत होते.

BRAVIA 3II हँड्स-फ्री व्हॉइस सर्चला सपोर्ट करतो आणि गुगल असिस्टंटसोबत काम करतो, ज्यामुळे वापरकर्ते केवळ आवाजाच्या कमांडद्वारे कंटेंट शोधू शकतात, टीव्ही नियंत्रित करू शकतात किंवा सुसंगत स्मार्ट होम उपकरणांचे व्यवस्थापन करू शकतात. अधिक सोयीसाठी यामध्ये ॲपल गुगल कास्ट, एअरप्ले २, ॲपल होमकिट आणि ॲमेझॉन अलेक्सा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, २०२६ च्या सर्व मॉडेल्सना ओटीए अपडेटद्वारे गुगल जेमिनी सपोर्ट मिळेल. यामुळे प्रगत एआय-आधारित व्हॉइस संवाद आणि अधिक हुशार कंटेंट डिस्कव्हरीचा अनुभव वापरकर्त्यांना मिळेल.

सोनी पिक्चर्स कोरसह स्टुडिओ-क्वालिटी कंटेंटचा लाभ घ्या

BRAVIA 3II ग्राहकांना सोनी पिक्चर्स कोरच्या माध्यमातून घरीच स्टुडिओ-क्वालिटी मनोरंजनाचा अनुभव घेण्याची संधी देते. यामध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचा निवडक संग्रह असून, त्यामध्ये आयमॅक्स एन्हांस्ड चित्रपटांचाही समावेश आहे. चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने चित्रपट अनुभवावा असे वाटते, तोच सिनेमॅटिक अनुभव थेट घरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म डिझाइन केला गेला आहे.

प्युअर स्ट्रीम तंत्रज्ञानामुळे वापरकर्ते ८० एमबीपीएसपर्यंतच्या वेगाने स्ट्रीमिंग करू शकतात, ज्यामुळे ४के ब्लू-रे गुणवत्तेशी तुलना करता येईल अशी असाधारण चित्र स्पष्टता मिळते. याव्यतिरिक्त, ग्राहकांना १२ महिन्यांसाठी ५ विशेष मुव्ही क्रेडिट्स मिळतात, ज्याद्वारे ते त्यांच्या ब्राव्हिया टीव्हीवर प्रीमियम चित्रपट त्वरित निवडून त्यांचा आनंद घेऊ शकतात.

सुधारित सुलभता आणि टिकाऊपणासह विचारपूर्वक केलेले डिझाइन

BRAVIA 3II चे डिझाइन स्लीक आणि मिनिमलिस्टिक असून ते आधुनिक घरांच्या सजावटीला अधिक आकर्षक करते. सर्वसमावेशकता लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा टीव्ही नवनवीन विकसित इन्क्लुझिव्ह रिमोट कंट्रोलसह येतो. यामध्ये सुलभ नेव्हिगेशनसाठी बटणांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, वेगवेगळे आकार आणि बटणांमध्ये पुरेसे अंतर देण्यात आले आहे.

विविध वातावरणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हा टेलिव्हिजन सोनीच्या एक्‍स-प्रोटेक्शन प्रो तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान धूळ, आर्द्रता, वीज पडणे आणि विजेचे चढ-उतार यांपासून संरक्षण देऊन टीव्हीचा टिकाऊपणा वाढवते. इको डॅशबोर्ड २ मुळे वापरकर्ते विजेच्या वापराचे परीक्षण करू शकतात आणि ऊर्जा बचतीसाठी आवश्यक माहिती मिळवू शकतात.

किंमत आणि उपलब्धता:

मे २०२६ पासून BRAVIA 3II भारतातील सर्व सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह), www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्स आणि महत्त्वाच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

Model Screen Size MRP (in INR) Best Buy (in INR) Availability Date
BRAVIA 3 II

 

55 (140 cm) INR 1,59,900 INR 99,990 May 2026 Onwards
65 (165 cm) INR 1,99,900 INR 1,24,990
75 (190 cm) INR 2,89,900 INR 1,79,990
85 (215 cm) INR 5,19,900 INR 3,05,990 August 2026 Onwards

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now