कॅशबॅक व आकर्षक ईएमआय ऑफर्ससह सॅमसंग गॅलेक्‍सी A57 आणि A37 च्‍या विक्रीला सुरूवात

By: Abhi

On: Friday, April 10, 2026 2:07 PM

सॅमसंग गॅलेक्‍सी A57
Google News
Follow Us

आता ‘ट्रिपल झीरो स्किम’च्‍या माध्‍यमातून प्रतिमहिना फक्त १६२५ रूपये ईएमआयसह उपलब्‍ध

सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड १० एप्रिलपासून नवीन लाँच करण्‍यात आलेले गॅलेक्‍सी A57 ५जी आणि गॅलेक्‍सी A37 ५जी स्‍मार्टफोन्‍सच्‍या विक्रीला सुरूवात करणार आहे. नवीन ए सिरीजमध्‍ये तरूण वापरकर्त्‍यांसाठी प्रमुख डिवाईसेसमधील क्षमतांचा समावेश आहे, जे टिकाऊ व आकर्षक स्लिम फॉर्म फॅक्‍टरमध्‍ये फोटोग्राफी, कार्यक्षमता आणि एआय-समर्थित वैशिष्‍ट्यांना महत्त्व देतात.

गॅलेक्‍सी A57 ५जी ऑसम नेव्‍ही, ऑसम आइसीब्‍ल्‍यू आणि ऑसम लिलाक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे, जेथे ८ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ५६,९९९ रूपये आणि १२ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ६२,४९९ रूपये आहे. गॅलेक्‍सी A37 ५जी ऑसम लेव्‍हेंडर, ऑसम ग्रेग्रीन आणि ऑसम चारकोल या आकर्षक रंगांमध्‍ये येतो, जेथे ८ जीबी/१२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ४१,९९९ रूपये, ८ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ४७,४९९ रूपये आणि १२ जीबी/२५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी किंमत ५२,९९९ रूपये आहे.

ग्राहक ट्रिपल झीरो स्किमच्‍या माध्‍यमातून Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह व पार्टनर स्‍टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर गॅलेक्‍सी A57 ५जी आणि गॅलेक्‍सी A37 ५जी खरेदी करू शकतात, ज्‍यामध्‍ये झीरो डाऊन पेमेंट, झीरो इंटरेस्‍ट आणि झीरो हॅसलचा समावेश आहे.

या स्‍मार्टफोन्‍सना अधिक लक्षवेधक करण्‍यासाठी सॅमसंग अनेक विशेष ऑफर्स सादर करत आहे…

  • ३६,९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींसाठी ५००० रूपयांचा अपग्रेड बोनस.
  • बँक किंवा यूपीआय व्यवहारांवर ३८,९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींसाठी ३००० रूपये कॅशबॅक.
  • २४-महिने झीरो-इंटरेस्‍ट ईएमआय पर्याय + १६२५ रूपये इतक्‍या कमी किमतीपासून सुरू होणाऱ्या ईएमआयसाठी ३००० रूपयांचा अपग्रेड बोनस.

या दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरासह ‘नाइटोग्राफी’साठी सुधारित इमेज प्रोसेसिंग आहे. सेटअप सुस्‍पष्‍ट फोटोची, तसेच अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटो कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते. अतिरिक्त वैशिष्‍ट्यांमध्‍ये अल्‍ट्रा-वाइड व मॅक्रो लेन्‍सेस आहेत, तसेच सातत्‍यपूर्ण फोटो व व्हिडिओ आऊटपुटसाठी १२ मेगापिक्‍सल एचडीआर फ्रण्‍ट कॅमेरा आहे. एआय-समर्थित टूल्‍स, जसे बेस्‍ट फेस आणि ऑब्‍जेक्‍ट इरेजर त्‍वरित एडिट्सची सुविधा देतात, तसेच प्रत्‍यक्ष डिवाईसवर ग्रुप फोटोंमध्‍ये सुधारणा करतात.

गॅलेक्‍सी A57 ५जी आणि गॅलेक्‍सी A37 ५जी दीर्घकाळापर्यंत टिकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या डिवाईसेसच्‍या पुढील व मागील बाजूस गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस+ आहे, तसेच पाणी व धूळीपासून संरक्षणासाठी आयपी६८ रेटिंग आहे. दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये दीर्घकालीन उपयुक्ततेसाठी सहा अँड्रॉईड ओएस अपग्रेड्स आणि सहा वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत.

नवीन ए सिरीजमध्‍ये सॅमसंग बिक्‍स्‍बी, जेमिनी व परप्‍लेक्सिटी सारखे एआय-संचालित टूल्‍स आहेत. सर्कल टू सर्च, डायरेक्‍ट वॉईसमेल आणि रिअल-टाइम कॉल ट्रान्स्क्रिप्‍शन यांसारखी वैशिष्‍ट्ये शोध, संवाद व कन्‍टेन्‍ट संवाद यांसारखे दैनंदिन टास्‍क्‍स सोपे करतात. या स्मार्टफोन्‍समध्ये सॅमसंग नॉक्स व्हॉल्ट देखील समाविष्ट आहे, जे विशेष टॅम्पर-रेझिस्टंट हार्डवेअरमध्ये डेटा साठवते. हे हार्डवेअर स्तरावरील हल्ल्यांवर लक्ष ठेवते आणि त्‍यांना प्रतिबंध करते.

गॅलेक्‍सी A57 ५जी मध्‍ये एक्झिनॉस १६८० ची शक्ती आहे, जे पूर्वीच्‍या जनरेशनच्‍या तुलनेत ३३ टक्‍के उच्‍च एनपीयू कार्यक्षमता आणि १५ टक्‍के उच्‍च सीपीयू व जीपीयू कार्यक्षमता देते. गॅलेक्‍सी A37 ५जी एक्झिनॉस १४८० प्रोसेसरवर चालतो, जे एनपीयू कार्यक्षमतेमध्‍ये १६२ टक्‍के सुधारणा, तसेच सीपीयूमध्‍ये १५ टक्‍के सुधारणा आणि जीपीयूमध्‍ये १९ टक्‍के सुधारणा दाखवते. दोन्‍ही डिवाईसेस एलपीडीडीआर५एकस रॅम व यूएफएस ३.१ स्‍टोरेजसह येतात, जे अॅप्‍लीकेशन लोड होण्‍याचा वेळ कमी करतात आणि वेगाने फाइल ट्रान्‍सफर करतात.

गॅलेक्‍सी A57 ५जी आणि गॅलेक्‍सी A37 ५जी मध्‍ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी सरासरी वापरादरम्‍यान दोन दिवसांपर्यंत कार्यरत राहते आणि ४५ वॅट रॅपिड चार्जिंग क्षमता आहे.

Abhi

Abhi quietly focused, effortlessly real. Building his own path, one step at a time. ✨
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now