आदिवासी कलाकार सादर करणार रामायणावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम

By: Editor_Manas

On: Tuesday, March 17, 2026 4:27 PM

Google News
Follow Us

पुणे : एकल अभियानच्या वतीने येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमधील विवेकानंद सभागार येथे “एकल सुर-ताल – भारताचे रंग, एकलच्या संगतीने” हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या एकल अभियान या देशव्यापी उपक्रमाच्या जनजागृती आणि संपर्क मोहिमेचा हा एक भाग आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे “एकल सुर-ताल” ही विशेष सांस्कृतिक प्रस्तुती होय. एकल अभियान अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या आदिवासी तरुण-तरुणींचा चमू संगीत, नृत्य आणि नाट्यमय कथनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. भारतीय परंपरा, संस्कार आणि रामायण या महाकाव्यावर आधारित कथानक सादर करत कलाकार भारतीय संस्कृतीचे वैभव प्रेक्षकांसमोर उभे करणार आहेत. पारंपरिक वेशभूषा, लयबद्ध नृत्य आणि प्रभावी संगीत यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असला तरी सभागृहातील जागा मर्यादित असल्याने उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरिकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ८८५६०५०२५८ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुण्यातील सांस्कृतिक रसिकांसाठी हा कार्यक्रम एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026