चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे 10 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे पुण्यात आयोजन

By: Editor_Manas

On: Friday, February 27, 2026 6:38 AM

Google News
Follow Us

पुणे, फेब्रुवारी 2026: चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे 13 ते 15 मार्च 2026 दरम्यान 10 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2026 (इंटरनॅशनल डायबेटिस समिट) चे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा व गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी असलेल्या योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई येथील प्रशासक व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय सीकल सेल निर्मूलन अभियानाचे सदस्य व थॅलेसेमिया ॲन्ड सीकल सेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रूघवानी यांच्या हस्ते होणार आहे.

या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन संशोधन आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व मधुमेह आणि मधुमेह व्यवस्थापनामध्ये फॅटी लिव्हर (यकृताचा विकार) या विषयांवर कार्यशाळा, तसेच एंडोक्रोनोलॉजी व महिला आरोग्य या विषयावर परिसंवाद देखील घेण्यात येणार आहेत.

अमेरिकेतील मेयो क्लिनिक, यूकेमधील किंग्स कॉलेज, इम्पिरियल कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ सफोक, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर आणि युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरो, स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्युट, ऑस्ट्रियातील मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ ग्राझ, सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटी आणि इटलीतील युनिव्हर्सिटी ऑफ पादुआ येथील आंतरराष्ट्रीय तज्ञ, तसेच 70 हून अधिक नामवंत भारतीय तज्ञ या परिषदेत संवाद साधणार असून 2,000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील.

चेलाराम फाउंडेशन डायबेटिस रिसर्च अवॉर्ड्स – 2026: या परिषदेत मूलभूत संशोधन तथा क्लिनिकल संशोधन या प्रत्येक श्रेणीतील रु. 2 लाख आणि रु. 1 लाख पुरस्कार राशी जिंकण्यासाठी 75 हून अधिक युवा संशोधक प्रबंध सादर करणार आहेत. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट आणि ब्लू सर्कल फाऊंडेशन तर्फे रविवार 15 मार्च 2026 रोजी आयोजित “रन फॉर डायबेटिस” – 3 किमी आणि 5 किमी मॅरेथॉनमध्ये टाईप 1 मधुमेह असलेल्या मुलांसह 500 स्पर्धक सहभागी होतील.

स्वीडन येथील कॅरोलिंस्का इन्स्टिट्युट मधील प्राध्यापक व मॉलेक्युलर मेडिसिन सेंटरमध्ये डायबेटिस इम्युनोलॉजी या विषयावरील संशोधन गटाचे प्रमुख डॉ. करानी बी.संजीवी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल.

10 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2026 चे आश्रयदाता आणि चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे अध्यक्ष श्री. लाल चेलाराम म्हणाले की, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट ही संस्था मधुमेहाचे उपचार, संशोधन, शिक्षण आणि जागरूकता अशा उपक्रमांद्वारे मधुमेहाचा सामना करण्यात अग्रगण्य राहिली आहे.

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन ए.जी. म्हणाले की, 10 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2026 मध्ये प्रख्यात मधुमेह तज्ञ हे मधुमेह उपचार पध्दतींबाबत मार्गदर्शन करतील. या परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांचे मधुमेह व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल.

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य वैद्यकीय संचालक व विंग कमांडर (डॉ.) हर्षल मोरे (निवृत्त) म्हणाले की,चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटमध्ये एकाच छताखाली अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध असून, मधुमेह आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी संस्था अग्रस्थानी राहिली आहे.

10 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2026 चे उद्दिष्ट देशातील आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्यांना मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतींबद्दल सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026