Vivah Muhurat 2026 : सनई–चौघडे सज्ज! २०२६ मध्ये तब्बल ५९ शुभ विवाह मुहूर्त – तारखा नोंद करून ठेवा

Vivah Muhurat 2026: सनई–चौघडे सज्ज! २०२६ मध्ये तब्बल ५९ शुभ विवाह मुहूर्त – तारखा नोंद करून ठेवा

महत्वाचे मुद्दे :

  • २०२६ मध्ये एकूण ५९ शुभ विवाह मुहूर्त

  • जानेवारीत एकही विवाह मुहूर्त नाही

  • पहिला मुहूर्त – ५ फेब्रुवारी २०२६

  • शेवटचा शुभ विवाह दिवस – ६ डिसेंबर २०२६

नवीन वर्ष २०२६ मध्ये विवाहासाठी योग्य दिवस शोधणाऱ्यांसाठी सुखद बातमी आहे. astrologers च्या मते हे वर्ष विवाह आणि शुभ कार्यांसाठी अत्यंत अनुकूल मानले जात आहे. वर्षभरात एकूण ५९ शुभ मुहूर्त उपलब्ध असणार आहेत. कोणत्या महिन्यात किती शुभ दिवस आहेत, ते येथे जाणून घ्या.

जानेवारी २०२६ – लग्नासाठी प्रतिकूल

वर्षाची सुरुवात लग्नासाठी शुभ नसणार आहे. जानेवारीत खरमास असल्यामुळे आणि शुक्र मावळलेल्या अवस्थेत असल्यामुळे जानेवारी महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही.

फेब्रुवारीपासून शुभ दिवसांची सुरूवात

५ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्षातील पहिला शुभ विवाह मुहूर्त येतो. यानंतर पुन्हा वर्षभरात विविध महिन्यांत शुभ दिवसांची मालिका आहे. वर्षातील शेवटचा शुभ दिवस ६ डिसेंबर २०२६ रोजी असेल.

२०२६ मधील लग्नासाठी शुभ तारखा

मे २०२६

१, ३, ५, ६, ७, ८, १३, १४

जून २०२६

२१, २२, २३, २४, २५, २६, २७, २९

जुलै २०२६

१, ६, ७, ११

नोव्हेंबर २०२६

२१, २४, २५, २६

डिसेंबर २०२६

२, ३, ४, ५, ६, ११, १२